शहर इंटरटेनमेंट प्रस्तुत राज्यस्तरीय गायन स्पर्धेत धुळे येथील सौ.चेतनाताई जयुनाना बडगुजर प्रथम – सौ. संयोजिता बडगुजर, चाळीसगांव

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

नुकतीच शहर एंटरटेनमेंट तर्फे कराओके सुपर या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे ऑनलाईनरीत्या आयोजन करण्यात आले होते. यात विविध विभाग करण्यात आले होते व त्यात संपूर्ण महाराष्ट्र भरातून विविध क्षेत्रातील युवक,युवती, महिला, उद्योजक, आणि जेष्ठ समाजसेवक (पुरुष) अशा भरपूर गायक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत आपल्या बडगुजर समाजातील तीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.महिला विभागात सौ. चेतनाताई जयुनाना बडगुजर तसेच युवक विभागा मध्ये चिरंजीव प्रथम बडगुजर व उद्योजक विभागांमध्ये श्री.मोहन बडगुजर यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत प्रथम फेरीतून टॉप ५० नंतर टॉप ३० व नंतर टॉप १० अशा पद्धतीने व्हिडीओस मिळालेल्या प्रतिसादावरून निवड करण्यात आली. प्रत्येक फेरीसाठी स्पर्धकांनी नविन गाणे तयार करून अपलोड करून पाठवायचे होते.

यामध्ये महिला विभागातील स्पर्धक सौ. चेतनाताई ह्यांनी तीनही फेरीत भरपूर प्रतिसाद मिळवत अंतिम फेरीत पोहोचल्या.आपल्या सुमधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजामुळे या स्पर्धेत त्यांनी आपली एक आगळी वेगळी छाप सोडत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले.

सौ.चेतनाताई या आता महाराष्ट्राचा उभरता आवाज बनल्या आहेत. बडगुजर समाजासाठी ही अतिशय अभिनंदनीय व भूषणावह बाब आहे. सौ.चेतनाताई या धुळे येथील श्री.जयुनाना वसंतराव बडगुजर यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांनी बीएस्सी बीएड पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच त्या श्री श्री रविशंकर जी यांच्या आर्ट ऑफ लिविंग च्या वालंटियर आहेत. त्यांना गायनाची आवड ही अगदी लहानपणा पासूनच होती. वेळात वेळ काढून त्यांनी ही आपली कला जोपासली. ते म्हणतात ना, “हौसला हो बुलंद तो मंजिले दूर नही” याप्रमाणे सौ.चेतनाताई यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या स्वबळावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरल्या. त्यांची फारशी ओळख नसतांनाही बडगुजर समाज बांधवांनी आणि महाराष्ट्र वासियांनी त्यांच्या या गायन व्हिडिओला लाईक, सबक्राईब करुन मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाला साथ देत त्यांना प्रचंड मतांनी विजयी केलं.

तसेच जळगांव चि. प्रथम बडगुजर यांस उत्कृष्ट गायन व सादरीकरण यासाठी निवड करण्यात आली. उद्योजक/व्यापारी विभागातून मुंबई येथील श्री. मोहन बडगुजर यांना व्दितीय मिळाला. सदर विजेत्यांना पारीतोषीक समारंभ पुढील वर्षी २६ जानेवारी ला मंगळवेढा येथे सेलिब्रिटी आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सौ. चेतनाताई यांनी गायिलेले गाणे खास आपल्यासाठी

आपल्या गौरवशाली भारत देशात एकमेव प्रथम महिला राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी प्रथम अंतराळवीर कल्पना चावला प्रथम ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट पी. टी. उषा इत्यादी अशा अनेक स्त्रीशक्ती आपल्या देशात आहेत. व त्यांनी आपल्या कला कौशल्याने विविध क्षेत्रात आपल्या देशाचे नाव उंच केले आहे व देशाला यश मिळवून दिले आहे. तसेच सौ.चेतनाताई यांनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळवत बडगुजर समाजाचे, सासर, माहेर या कुटुंबाचे नांव रोशन करुन संपूर्ण महाराष्ट्र भरातून प्रसिद्धीस पात्र ठरल्या असून बडगुजर समाजातील आणि इतर वृत्तपत्रातून तसेच
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून त्यांच्या ह्या गायनाचे कौतुक, अभिनंदन, हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आम्ही त्यांची अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर.इन तर्फे हार्दिक अभिनंदन करतो पुढील भव्य वाटचालीस शुभेच्छा देतो.

5 Comments

  1. सौ.चेतनाताईंनी गायनामध्ये मिळविला नंबर पहिलाl
    अभिमानाने सांगा बडगुजर समाजातील त्या प्रथम महिलाll
    सौ.चेतनाताईंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व कौतुक.
    येथून पुढेही त्यांना घवघवीत यश व प्रसिध्दी मिळत राहो व त्यायोगे बडगुजर समाजाची “आन-बान-शान” वाढत राहो ही परमेश्वरास प्रार्थनाl

    • सुपर सिंगर स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व बडगुजर मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा

  2. चेतना ताईना खरच गायनाची खूप आवड पण एक वेळ असते त्या वेळेत आपण पाहिले प्राधान्य आपल्या कर्तव्याला,जबाबदारीना देतो आणि त्यात आपले छंद बाजूला ठेवतो पण ताई ने उशिरा का असेना आपल्या छंदाचे दार ठोठावले आणि ते आपल्या सर्व्हच्या मदतीने,आपल्या सहकार्याने उघडले सुद्धा ,असेच प्रेम कायम असू देत आपल्या सर्व्हनचे खूप खूप आभारी आहोत .ताई चा आवाज खरच खूप सुंदर आणि मधुर आहे ताई आमची मोठी बहीण म्हणून खूप अभिमान आहे आम्हाला तिचा.ताई तुला पुढच्या वाटचाली साठी तुझ्या 3 घी भाऊ बहिणी कडून खूप खूप शुभेच्छा …

  3. सौ. चेतनाताई , प्रथम व श्री मोहन हिरालाल बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन , आपण समाजाचा मान वाढवला

Leave a Reply to S. M. Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*