ज्येष्ठ ॲड विधीतज्ञ कै. निर्मलकुमार सूर्यवंशी यांची जयंती – श्री. धिरज बडगुजर सोनशेलू

कै. निर्मलकुमार सुर्यवंशी यांची आज जयंती, वकिली क्षेत्रात प्रदीर्घ चाळीस वर्षे यशस्वी वाटचाल करताना त्यांनी अनेक गरीब, शोषीतांच्या हक्कासाठी लढा दिला व त्यांना त्यांच्या हक्क हा मिळवुन दिला. विशेष म्हणजे आतापर्यंत ५ हजार आदिवासी बांधव, शेतकरी घटकांना कुठलीहील अडचण न येऊ देता. त्यांना ह्या मोफत आपल्या कामकाजातून जमिनी मिळवून दिल्यात.


व्यवसायात कधीही तडजोड न करता प्रामाणिकतेचीच कास धरली. त्यांनी आपल्या सेवेत असताना ते मग नर्मदा बचाव अांदोलन असो, की अंधश्रद्धा निर्मुलन समितीसाठी चे कार्यअसो, जगण्याचा प्रत्येकाला घटनेने दिलेला हक्क लक्षात घेऊन गरीब, असहाय व अतिक्रमण धारक असो की अन्यायाने पिडीत व्यक्ति त्यांच्यासाठी आयुष्य झीजवले आणि त्यांचा न्यायासाठी कायम टोकाचा संघर्ष केला आहे. ते माझे आदर्श आणि गुरु ही आहेत. त्यांचा आदर्श, त्यांनी दिलेले शिकण घेऊन मी त्यांच्या वाटेवर चालत आहे मला काही संकट आले की त्या संकटांवर मात आणि संघर्ष करत चालतो आहे.
आज वडिलांची पुण्यतिथी आहे.
ज्येष्ठ विधीतज्ज्ञ कै. निर्मलकुमार सूर्यवंशी (वय ७१) यांचे शनिवारी दि. 19 जानेवारी 2018 ला दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
ज्येष्ठ विधीतज्ज्ञ कै. निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी यांनी दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालये आणि घटनापीठाचे खटले, जनहित याचिका, धर्मदाय संस्थाशी निगडित खटले यासोबतच सुमारे पाच हजारापेक्षा अधिक आदिवासी कुटुंबींयांना विनामूल्य जमिनी मिळवून देणे आदी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. सरदार सरोवर प्रकल्प आणि नर्मदा बचाव प्रकल्प यांच्याशी निगडित नर्मदा बचाव आंदोलन यांच्याशी कै. निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा निकटचा संबंध होता.

या आंदोलनांशी निगडीत खटल्याचे कामकाज पाहातांना सूर्यवंशी यांनी अनेक वेळा प्रभावी युक्तिवाद केला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याच्या खटल्यासाठी त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते माजी जिल्हाध्यक्ष व सल्लागार होते. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे ते सल्लागार होते.


सकाळ मीडिया ग्रुपचे खान्देशचे असिस्टंट चीफ रिपोर्टर, धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे ब्युरो चीफ श्री.निखिल सूर्यवंशी, व कॅनडातील संशोधक राहूल सूर्यवंशी यांचे ते वडील होत.

ज्येष्ठ अॅड विधीतज्ज्ञ कै. निर्मलकुमार सूर्यवंशी पुण्यतिथी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*