सोनशेलू येथे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ५०० कुटुंबांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपः
“ॐ ऐं ऱ्हीं क्लिं चामुंडायै विच्चे” सोनशेलूः येथील ‘माॅ चामुंडा माता ट्रस्ट, सोनशेलू’ आई चामुंडा फॉऊडेंशन नंदुरबार,अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्रॉऊड टीम यांचे संयुक्त विद्यामाने सोनशेलू गावात “कोवीड-१९ “ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती’ वाढवून गावकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहणेच्या उद्देशाने संपूर्ण गावातील ५०० कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन “अर्सेनिक-३०” होमियोपॕथी गोळ्यांचे वाटप,गावातील प्रमुख व्यक्तींचे उपस्थितीत करण्यांत आले त्यासोबतच पत्रकावर छापील स्वरूपात सदर गोळ्या घेण्याची पध्दत ही समजावून सांगण्यात आली.
दरवर्षी मा चामुंडा ट्रस्ट सोनशेलु व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व निरनिराळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यांच्या सहकार्याने समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रामुख्याने रक्तगट तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर , मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावर्षी covid-19 च्या प्रादुर्भावामुळे कुठलाही इतर कार्यक्रम न घेता पूर्ण गावाला अर्सनिक अल्बम या रोग प्रतिकार शक्ती वाढवणार्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी ‘माॅ चामुंडादेवी ट्रस्ट’,अध्यक्ष श्री.धिरज बडगुजर, श्री.भाईदास बडगुजर,उपाध्यक्ष, श्री.जयसिंग गिरासे,सरपंच, श्री.भाऊसिंग गिरासे,पोलिस पाटील, श्री.महेंद्र बडगुजर, श्री.संतोष बडगुजर,श्री.मनोज बडगुजर, श्री.राजेंद्र बडगुजर, श्री.संदिप बडगुजर,श्री.रमेश बडगुजर,श्री.सुनिल बडगुजर, श्री.प्रदिप गिरासे,श्री.एकनाथ धनगरे,डाॅ.मुरलीधर पाटिल, श्री.मधुकर बडगुजर,श्री.भिका बडगुजर,श्री.छोटू महाजन आदिंचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रम आयोजित केलेबद्दल,सोनशेलू ग्रामपंचायत,पोलिसपाटील व गावातील विविध पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व माॅ चामुंडा देवी ट्रस्ट,आई चामुंडा फॉऊंडेशन नंदुरबार,अ.भा. बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड टीमचे विशेष आभार मानलेत व भविष्यात ही अश्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजित करण्यात येणेसंबंधीचे आव्हान करण्यांत आले,त्यासांठी योग्य ते सहकार्य गावातर्फे करण्यात येईल असे आश्वाषित केले.


Leave a Reply