दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी सात वाजता अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बडगुजर बिझनेस फोरम ग्रुपच्या सहकार्याने आयोजित बडगुजर समाजातील पहिला व्यवसाय मार्गदर्शन पर कार्यक्रम श्री. सुनील जाधव सर बिजनेस कोच ,लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर व संस्थापक, सुनिल जाधव ट्रेनिंग , मुंबई www.suniljadhav.com
यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रम हा युट्युब वरून लाईव्ह स्वरूपात घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोकेश कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ऑनलाइन पद्धतीने दिप प्रज्वलन व बडगुजर समाज कुलदेवता आई चामुंडा मातेचे स्मरण करून श्री. माधवराव जानकीराम बडगुजर, अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर महासमिती, तसेच श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर – उपाध्यक्ष,
श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर – सचिव व श्री. आनंदा धोंडू सूर्यवंशी – माजी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकात श्री. लोकेश कोतवाल यांनी प्रमुख मार्गदर्शक श्री सुनील जाधव सर यांचा अल्पसा परिचय करून दिला. ऑनलाइन पद्धतीने त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्री. माधवराव बडगुजर - अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर महासमिती यांनी, तसेच श्री भगवान बडगुजर, श्री राजेन्द्र बडगुजर,आणि श्री आनंदा सूर्यवंशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर उत्कृष्ट संवाद कौशल्याने श्री .सुनिल जाधव सर यांनी सर्वांची मने जिंकली. खरं तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी ""टीन ते टायकून """ असा आपल्या जीवनाचा परिचय करून दिला. एका सर्वसाधारण कुटुंबात रिक्षा चालवणारे वडील व घरकाम सांभाळणाऱ्या आईच्या पोटी त्यांचा हलाखीच्या परिस्थितीत जन्म झाला. स्वतःचा जीवन चरितार्थ चालविण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी कामे केली. यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन चौथ्या प्रयत्नात ते दहावी पास झाले. मात्र नंतर त्यांनी गरुड झेप घेत महाराष्ट्र पोलीस खात्यातील नोकरी नंतर एक उत्कृष्ट बिजनेस कोच म्हणून ,तसेच E2E ( Employee to Entrepreneur ) कर्मचारी ते उद्योजक होण्याचे ७ सूत्र या पुस्तकाचे बेस्ट सेलिंग लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर व संस्थापक, सुनिल जाधव ट्रेनिंग , मुंबई www.suniljadhav.com

इथपर्यंत मजल मारली. दुसऱ्यांना केवळ उपदेश न करता”” आधी केले मग सांगितले”” या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या वक्तव्यातून झाला. नोकर न बनता नोकरी देणारे उद्योजक होण्याचे आव्हान त्यांनी सर्व तरुणांना केले. आताचे नवीन नोकर भरती धोरण पाहिले असता कंत्राटी पद्धतीने नोकर भरण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. यामुळे भविष्यकाळात सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपण स्वतःचा लहान-मोठा असा उद्योग सुरू करून रोजगार उपलब्ध करून देणारे व्यवसायिक झाले पाहिजे. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सकाळच्या प्राप्त विधि पासून ते रात्री पर्यंत व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी विचारात घेऊन, तसेच आपण असलेल्या स्थानिक स्थितीचा अभ्यास करून उद्योग कसा निवडावा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केले. युट्यूब वरती केवळ नुसतेच मार्गदर्शन न करता त्यांनी लाईव्ह चाट करून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली.

या कार्यक्रमास बडगुजर समाजातील अनेक मोठ्या उद्योजकांनी उपस्थिती दिल्यामुळे सदर कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. यामध्ये श्री. सुरेश महाले (भुसावळ येथील दूध व्यवसायिक ), श्री. विजय बडगुजर ( मेडिकल हॉस्पिटल व ऑटोमोबाईल प्रायोजक ), डॉ. मनोज बडगुजर ( पनवेल पोल्ट्री फार्म उद्योजक ), श्री. बापू किसन बडगुजर (मुंबई येथील इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअरिंग प्रोजेक्टर ), सौ. हर्षाली मनोज शिंदे ( औरंगाबाद येथील ब्युटी प्रॉडक्ट निर्मात्या) ,श्री. देवराम चव्हाण (नाशिक येथील सिरॅमिक व टाइल्स निर्माते ) ,श्री. संतोष बडगुजर ( शिंदखेडा येथील पशुखाद्य व्यवसायिक ), सुरत येथील गारमेंट आणि टेक्स्टाईल उद्योजक श्री.अमोल बडगुजर, जळगाव येथील ऊर्जा ठिबक व इरिगेशनचे निर्माते श्री. जयेश गोपीचंद पवार, पुणे येथील ऍग्रो आणि हर्बल प्रोडक्ट निर्माते श्री .शैलेश बडगुजर तसेच अहमदाबाद येथील www.digitalclassworld.com चे संस्थापक श्री. हितेश भाई मोहकर यांनी उपस्थिती दिली होती.
बडगुजर समाजातील सर्व स्तरांमधून प्रतिष्ठित व अनेक समाज बांधवांनी उत्कृष्ट अशा प्रतिक्रिया व्यक्त करून अखिल भारतीय बडगुजर युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप राबवित असलेल्या उपक्रमांची स्तुती केली आहे. सदर विषयाचे गहन स्वरूप बघता येणाऱ्या भावी काळामध्ये सुद्धा याच मार्गदर्शन शिबिराच्या दुसऱ्या भागात उद्योग व्यवसायांची सरकारी नोंदणी, कायदेशीर रित्या कशी करावी त्यासाठी भांडवल उपलब्धता कशी करावी व अशा अनेक कायदेशीर बाबींवर वरील मार्गदर्शन पुढील भागात करण्यात येणार आहे .सदर कार्यक्रमाचे आभार बडगुजर.इनचे क्रिएटर श्री. अविनाश दिवाकर बडगुजर यांनी मानले व भविष्यकाळात सुद्धा अशाच प्रकारचे समाजाभिमुख व नव तरुणांना विविध विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जाईल असे आश्वासन श्री. अविनाश बडगुजर यांनी दिले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दिलीप राघो बडगुजर, श्री. प्रणव कोठवाल, श्री. दिनेश बडगुजर, श्री. चंद्रकांत बडगुजर, श्री. दिपक भिका बडगुजर, श्री. विजय बडगुजर, श्री. धिरज बडगुजर, श्री. रविंद्र बडगुजर, प्रा. प्रशांत बडगुजर, प्रा. मिलिंद बडगुजर सर, श्री. संदीप कोतवाल, श्री. हितेशभाई मोहकर, श्री. विनोद मोहकर, श्री. मनिष बडगुजर, श्री. विजय बडगुजर, पुणे इ. अनेक समाजबांधवांनी तसेच इतर सन्मानीय सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी अखिल भारतीय बडगुजर महासमितीच्या वतीने त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply