बडगुजर समाजाला लागले डिजिटल चे वेध मुंबईच्या उत्कर्षाच्या झूम मिटिंगची सर्वत्र चर्चा दहा दिवसांपूर्वी मुंबई येथील उत्कर्ष मंडळाने झूम मीटिंग घेतली या मीटिंगची सर्वत्र चर्चा होत आहे.
याआधी युवकांनी वेबिनार, व्हिडिओ माध्यमातून अनेकदा प्रबोधन केले. मात्र प्रत्यक्ष झूम मीटिंगची पहिलीच नोंद यानिमित्ताने उत्कर्षाच्या माध्यमातून झाली. केवळ औपचारिक मीटिंग असलेल्या झूमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय होऊन नूतन अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला.झूम मीटिंगमध्ये अनेकांनी प्रथमच सहभाग घेतला आणि तो आनंदाने साजरा केला.
लाॅकडाउनचे अनुभव कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक बांधव आपल्याला सोडून गेले त्यांच्या आठवणी जागृत केल्या त्यानंतर समाजातील अनेकांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली त्यातून उत्कर्षाला पुढील दिशा मिळाली नूतन अध्यक्ष श्री.श्रीकृष्ण बडगुजर माजी अध्यक्ष श्री.भगवान बडगुजर यांच्यासह श्री.सतीश बडगुजर, श्री.मोहन बडगुजर. श्री. आर. डी. चव्हाण, सौ. नंदिनी बडगुजर, श्री.ज्ञानेश्वर मोरडिया, श्री.प्रकाश बडगुजर श्री.दीपक बडगुजर, श्री.अशोक बडगुजर, श्री.भगवान सर, श्री.आलोणे आदींनी सहभाग घेतला सचिव श्री.रमाकांत बडगुजर यांनी उत्कृष्ट संचालन केले.
उत्कर्षाच्या झूम मीटिंग नंतर गेल्या दहा दिवसात गावागावातून अनेकांनी फोन करून या मिटिंग बद्दल विचारणा केली मिटींगचे आयोजन कसे करावे यासाठी काय सुचना तांत्रिक बाबी काय काय लागतात याची माहिती करून घेतली. त्यानंतर नवी मुंबईतही गूगल मीट घेण्यात आली
एकंदरीतच गावागावांमध्ये आता झूम मिटींग होऊ लागले आहेत येत्या काळात आपला समाज शंभर टक्के डिजिटल होणार हे आता निश्चित झाले आहे.



अभिनंदन श्री मदन शेठ तुम्ही नेहमी समाज विधायक कार्यात सक्रिय रहा नवीन संकल्पना समाजासमोर मांडले तर समाज संघटन होईल धन्यवाद
अभिनंदन श्री मदन शेठ तुम्ही नेहमी समाज विधायक कार्यात सक्रिय रहा नवीन संकल्पना समाजासमोर मांडले तर समाज संघटन होईल धन्यवाद
दि.11.10.2020 रोजी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ व बडगुजर दर्शन संयुक्त कार्यकारीणीची झुमरू मिटींग घेण्यात आली. या झुम मिटींगमध्ये बर्याच महत्वाच्या विषयावर चर्चा झाली, अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या पदग्रहणावर मागील सर्व साधारण सभेतील ठरावानुसार शिक्कामोर्तब झाले. याचा सविस्तर वृतांत जेष्ठ संपादक श्री. मदन बडगुजर यांनी तसेच विद्यमान संपादक श्री. प्रकाश बडगुजर यांनी प्रसारित केला. ठरल्याप्रमाणे डिजिटल युगाला सुरूवात करण्यासाठी व चर्चा झालेल्या विषयावर कृती व अंमलबजावणीसाठी नुतन अध्यक्षांनी डिजिटल माध्यम व प्रसंगी प्रत्यक्ष भेट घेउन (कोवीळ19 नियमाचे पालन करुन) कार्यारंभ करावा व आपल्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा समाजाला लाभ द्यावा.