धरणगाव येथे सालाबादप्रमाणे सलग 33 व्या वर्षी दिहीचा परिवारातर्फे श्री.चामुंडा देवीचे चक्रपूजा(थाट) उत्साहाने साजरा – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

धरणगाव येथे 33 वर्षांची उज्ज्वल परंपरा कायम..

धरणगाव येथे सालाबादप्रमाणे सलग 33 व्या वर्षी दिहीचा परिवारातर्फे श्री.चामुंडा देवीचे चक्रपूजा(थाट) उत्साहाने साजरा

धरणगाव येथे सलग 33 व्या वर्षी दिहीचा परिवारातर्फे दि.23ऑक्टोबर रोजी अष्टमीच्या श्री. चामुंडा देवीचे थाट(चक्रपूजा) उत्साहाने साजरा झाले.
सालाबादप्रमाणे श्री. मनोहर गंगारामशेठ बडगुजर यांच्या घरी श्री.चामुंडा देवीच्या थाट चा कार्यक्रम होत असतो आणि यावर्षीही झाला. त्यांच्याच घरी नवरात्रीत श्री.चामुंडा देवीची घटस्थापना केली जाते.नवरात्रीत प्रत्येक दिवशी आरती केली जाते आणि गरबा,दांडिया ही मोठया उत्साहाने खेळला जातो. दिहीचा परिवारातील सर्व बंधू बघिनीं मोठ्या संखेंने उपस्थित राहतात.
त्याचप्रमाणे अष्टमी च्या दिवशी श्री.चामुंडा देवीचे थाट भरले जाते. यावर्षी या कार्यक्रमाचे 33 वे वर्ष होते. समजा दिहीचा परिवारातील एखादे कुटुंब स्वखर्चाने श्री. चामुंडा देवीचे थाट भरायला इच्छूक असेल तर तो भरू शकतो. म्हणून या वर्षी श्री.मुकेश रामदासशेठ बडगुजर यांनी स्वखर्चाने देवीचे थाट केले. आणि समजा एखाद्या कुटुंबाला स्वखर्चाने थाट करायचे असल्यास त्याचा 3 वर्षानंतर नंबर लागतो.
अष्टमी च्या दिवशी सकाळी दिहीचा परिवारातील सर्व बांधव देवीचे थाटासाठी लागणारे साहित्य व पूजा घ्यायला जातात. जेवणासाठी लागणारे किराणा साहित्य आणल्यानंतर ते दिहीचा परिवारातील सर्व बघिनीं स्वच्छ करून त्याच दिवशी दळले जाते.
श्री.चामुंडा देवीच्या थाटमध्ये जेवणासाठी पुरण पोळी, खीर,चणे,फुनके(मनुका) असे पदार्थ केले जाते. हा सगळा स्वयंपाक आंब्याचा लाकडांचा वापर करून चुल्ह्यावर तयार केला जातो. त्याच दिवशी दिहीचा परिवारातील सर्व बघिनीं पुरणपोळया टाकतात, पुरणपोळ्या ह्या खापरावर टाकल्या जातात. साधारणतः 400 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम अष्टमी च्या दिवशी होत असतो. अष्टमीच्या दिवशी 7 वाजता ज्योत लावली जाते व तेव्हापासून जेवणाची सुरुवात होते.
असा हा कार्यक्रम सगळ्यांच्या मदतीने मोठया उत्साहाने साजरा होत असतो. विशेष बाब ही आहे की धरणगावात फक्त दिहीचा परिवाराचे फक्त 50 कुटुंब आहे तरी सुद्धा हा श्री.चामुंडा देवीच्या थाट चा कार्यक्रम सलग 33 वर्षांपासून पासून मोठया उत्साहाने साजरा होत आहे याला खरोखरच दाद द्यावी लागेल.
मला तर असे वाटते की एवढा मोठा देवीचा थाट चा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही साजरा होत नाही तो धरणगाव मध्ये साजरा केला जातो.
✍️✍️✍️✍️
रोहित बडगुजर,धरणगाव
9765627875

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*