श्री.चामुंडा देवी चोपडा – श्री. रविंद्र बडगुजर चोपडा

माँ. चामुंडा देवी चोपडा स्थळ श्री. पंडित विठ्ठल बडगुजर यांचे शेतात, तेलवाड रस्ता, चोपडा जि. जळगांव
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे श्री. माँ. चामुंडा देवी नवरात्र उत्सव अश्विन शु||१ दि.१७/१०/२०२० शनिवार पासुन सुरु होत आहे.
यावर्षी कोरोना महामारी चे सावट असल्याकारणाने उत्सव नाही, मातेचे घट, किंवा परंपरेने चालणारे विधी ही नाही कारण शासन च्या आदेशा प्रमाणे देवी चे मंदिर हे बंद आहे यांची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.
समाज बांधव हे सर्व काळजी घेऊन, मास्क वापरून, सोशल डिंस्टनसिग अंतर ठेऊन श्री. माँ चामुंडा मातेची सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व पुजा ही केली जाते. आपण फक्त देवीच्या चरणी प्रार्थना करू शकतो की माते सर्वांना सुखी ठेव, चांगलं आरोग्य प्रधान कर व जे आपले समाज बांधव व बधिनी या महामारी मुळे आजारी असतील त्यांना सुखरूप घरी येऊ दे हिच प्रार्थना सर्व देवी भक्ताच्या भक्तीचा स्वीकार कर.
येथील मंदिरावर गेल्या वीस वर्षा पासुन अखंड पने दोन्ही नवरात्र साजऱ्या होतात ….!! चामुंडा मातेच्या चरणी आपण आपली मनोकामना, इच्छापूर्ती ही देवीला सांगतो किंवा नवस असेल तर तो आपण या नवरात्रीमध्ये पुर्ण करतो. आपण पूजा व भक्ती यात थोडा बदल केलेला आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

आपणास विनंती आहे की घरीच रहा , सुरक्षीत रहा , आपली व आपल्या कुटुंब यांची काळजी घ्या

श्री. रविन्द्र बडगुजर चोपडा – 9881416858

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*