बोराडी ता. शिरपुर येथील आदर्श जेष्ठ समाजसेवक तथा मार्गदर्शक हरपला – स्व. नथ्थु (अण्णा) नामदेव शेठ बडगुजर यांचे दुःखद निधन

बोराडी ता. शिरपूर येथील समाज बांधव, श्री. डॉ. सुरेश नथ्थु बडगुजर & श्री. ज्ञानेश्वर विष्णु बडगुजर, श्री. संजय नथ्थु बडगुजर यांचे वडील बडगुजर समाजातील आदर्श जेष्ठ समाजसेवक, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे संस्थापक सदस्य, बडगुजर समाजभुषण बोराडी येथील सतीदेवी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन कै. नथ्थु (अण्णा) नामदेव बडगुजर यांचे २३/१०/२०२० रोजी दुपारी ४.४० वा. वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या २४/१०/२०२० रोजी सकाळी १० वा. बोराडी येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, सातपुुडा बडगुजर समाज मंडळ व बडगुजर समाज महिला मंडळ बोराडी, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

स्व. नथ्थु (अण्णा) नामदेव बडगुजर

3 Comments

  1. आमचे जेष्ठ बंधू , आदर्श समाज नेते , समाज मार्गदर्शक , सर्व समाजामध्ये लोकप्रिय असलेले नेतृत्व , मितभाषी , सतीदेवी पतपेढीचे लोकप्रिय चेअरमन , सर्वांना हवेहवेसे वाटणारे आण्णा सो . श्री नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला
    त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे , तो सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो .
    मृतात्म्यास शांती लाभो , अशी परमेश्वर चरणी प्रार्थना ..

  2. समाजभुषण, मार्गदर्शक, मिलनसार, सर्वांच्या येथे सुखा दुःखात सामील होणारे असे आमचे आदरणीय अण्णासाहेब ची दुःखद निधनाची बातमी एकूण धक्का बसला हा त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो मृतात्म्यास शांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना

Leave a Reply to अनिल सुपडू बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*