अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) वर्षी ह. मु. कल्याण येथील कु. वैष्णवी मनोज बडगुजर चे नेत्रदीपक यश – श्री. पंकज मनोहर जाधव, भाटपुरा ता. शिरपूर

अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) वर्षी ह. मु. कल्याण येथील रहिवासी श्री. मनोज पंडितराव बडगुजर व सौ. ज्योती मनोज बडगुजर यांची कन्या कु. वैष्णवी मनोज बडगुजर ने 720 पैकी 551 गुण मिळवून 96.44 पर्सेंटाइल पटकावले आहेत. या परीक्षेसाठी देशभरातून 16 लाख विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते. वैष्णवीने बारावीच्या परीक्षेतही 82% गुण मिळवून यश संपादन केले होते.

कोविड-19 च्या महामारीच्या काळात वैष्णवीने स्वतःवरील आत्मविश्वास जराही ढळू न देता, संयमाने, शांतमनोवृत्तीने व नेटाने अभ्यासात सातत्य ठेवून हे दैदिप्यमान यश संपादन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन वंचित ग्रामीण व गरीब समाजाला आरोग्यसेवा देण्याचा मनोदय वैष्णवीने व्यक्त केला आहे. वैष्णवीची ही इच्छा आई चामुंडाच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल ही खात्री आहे.

वैष्णवी तसेच तिच्या संपूर्ण परिवाराचे अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

कु. वैष्णवी मनोज बडगुजर

वार्तांकन—– पंकज मनोहर जाधव, भाटपूरा ता. शिरपूर जि. धुळे

2 Comments

Leave a Reply to Kiran badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*