नवरात्रोत्सवा निमित्त श्री. गणेश बडगुजर यांचे चामुंडा मातेच्या भक्तांसाठी “धाव धाव धाव चामुंडे माते धाव ” हे नविन गाणे रिलीज – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

यावर्षी कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावर्षीचा नवरात्रोत्सव अगदी साधेपणाने आणि काळजीपूर्वक साजरा केला जातोय. या परिस्थितीची जाणीव ठेवत आपले समाजातील गीतकार, संगीत विशारद श्री. गणेश भास्कर बडगुजर यांनी नवरात्रोत्सव निमित्ताने चामुंडा माते ला एक नविन आणि धमाकेदार असे धाव धाव धाव चामुंडे माते धाव धाव हे गाणे आपणा सर्वांसाठी युट्यूब व्दारे प्रकाशित केले आहे. सदर गाण्यामध्ये चामुंडा मातेच्या विविध मंदिरांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आहे. सर्वांनी चामुंडा मातेचे ऑनलाइन दर्शन नक्की घ्यावे.

गाण्याची लिंक खालील प्रमाणे :

श्री. गणेश बडगुजर हे यावल येथील रहिवासी असून त्यांनी B. A. Music (संगीत विशारद) केले आहे. ते सध्या जे. टी. महाजन कॉलेज, फैजपूर येथे संगीत शिक्षक आहेत व स्वतः ते म्युझिक कम्पोजर, डायरेक्टर तथा गायक आहेत.

याआधीही श्री. गणेश बडगुजर यांनी गेल्यावर्षी नवरात्री मध्ये चामुंडा मातेचे भक्तीभाव पुर्ण गीत गायले होते व ते सुपरहिटही ठरले. यावेळी सुध्दा नवरात्री निमित्त साधून त्यांनी हे गाणे तयार केले आहे.

त्यांनी स्वतःच हे गाणे डायरेक्ट केले व गायले सुध्दा आहे. मल्टीटास्किंग व्यक्तीमत्व श्री. गणेश बडगुजर सर यांच्या युट्यूब Chanel ला आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करावे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*