नंदुरबार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना बडगुजर सातत्याने आरोग्य देवा देत आहेत मग ते कोविड१९ असो की कुपोषण मुक्ती याविषयी त्यांची तत्पर सेवा ही नंदुरबार जिल्हासाठी मोलाची ठरत आहे.
डॉ. वंदना या राहुरी कृषी विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या वडिलांच्या क्षत्रछायेत वाढलेल्या डॉ.वंदना पाटील यांचे शिक्षण राहुरी येथे झाले. बारावीनंतर पुण्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
त्या राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात काम करत आहेत. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्यात त्यांनी काम केले. हृदयरोग झालेल्या २५ पेक्षा मुलांच्या शस्त्रक्रिया त्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने शक्य झाल्या आहेत. ही मुले आज स्वस्थ आणि तंदरूस्त आहेत.
तसेच त्या नंदुरबार जिल्हा हा कुपोषण मुक्त व्हावा यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहेत. कुपोषणाचे मूळ काय आहे, यात त्याच्या निर्मूलनाचे उत्तर दडले आहे. २००१ पासून कुपोषणासह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेत त्यांनी नंदुरबार जिल्हा गाठला. गेल्या २० वर्षांपासून कुपोषण मुक्तीसाठी काम करत उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत त्या करत आहेत. जिल्हा रुग्णालयात बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या डॉ. वंदना अशोक पाटील ह्या कोविड कक्षात काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणूनही ओळखल्या जातात. कोविड कक्षात सर्व प्रथम कर्तव्य बजावणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे.
प्रत्येक स्त्री ही आई झाल्यानंतर मुलांना मोठ्या शहरात पाठवून त्यांना प्रगतीवान बनविण्याचे ध्येय ठेवते. हे योग्य असेलही पण छोट्या त्यांना प्रगतीवान बनवण्याचे ध्येय शहरामध्ये राहून स्त्रिया मुलांना प्रेरणा देवू शकतात. कुटुंब आनंदी ठेवण्यासाठी सर्वच महिलांनी सकारात्मक राहून जाण हेच महत्त्वाचे आहे.
– डॉ. वंदना पाटील-बडगुजर, वैद्यकीय
अधिकारी, सिव्हिल,नंदुरबार.


Leave a Reply