जाहिर निवेदन
“रेशीमबंध” वधू-वर परिचय पुस्तिका २०२१
प्रकाशक : श्री. कन्हैयालाल बाजीराव बडगुजर (एस. के. प्रिंटीग प्रेस)
म्हस्कर प्लॉट. स्टेशन रोड, अमळनेर -४२५४०९ (जि.जळगांव)

सन्माननीय बडगुजर समाज बंधू-भगिनींना नमस्कार….
आजच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणताही समाज बांधव एकमेकांशी प्रत्यक्ष भेटून सुसंवाद ठेवू शकत
नसल्याने बडगुजर समाजातील उपवर मुला-मुलींचा विवाह जमविण्यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार विनिमय करून या समस्येवर मार्ग शोधण्यासाठी प्रत्यक्ष/ऑनलाईन पद्धतीने उपवर वधू-वरांचे परिचय संकलीत करून त्यांचे पुस्तक स्वरूपात परिचय पुस्तिका प्रसिद्ध करून पोस्ट / कुरीयर द्वारे घरपोच आपल्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घेतले असून त्यासाठी पुस्तिका आणि नोंदणी इ. खर्चासह ना नफा ना तोटा तत्वावर रूपये १००/- शुल्क आकारण्यात आलेले आहे.
तरी समाज बंधू-भगिनींनी आपल्या उपवर मुला-मुलींची माहिती खालील दिलेल्या वधू-वर परिचय पुस्तिका समितीकडे ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन व्हॉटस्अप अथवा इमेल द्वारे तसेच फोन पे / गुगल पे /अकौंटनंबर वर / रोख
रू. १००/- पाठवावेत परिचय पुस्तिका २५ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित करण्यात येईल कळावे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये
१) समाज बांधवांना वधू-वर स्थळे शोधण्याकामी लागणाऱ्या अमूल्य वेळेची बचत होणार.
२) समाजातील वधू-वरांची घरबसल्या माहिती मिळणे सोईस्कर होईल.
३) पैसा, वेळ यांचा अपव्यय व होणारा त्रास यातून सुटका होईल.
४) कुठल्याही समाज मंडळातर्फे दरवर्षी आयोजित मेळाव्यांच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांचा अपव्यय व त्यांच्यातील
हेवेदावे तसेच चुकीचा समज-गैरसमज या गोष्टींना आळा बसेल. हिच समाजाची आर्थिक शक्ती समाजाच्या दुसऱ्या
विधायक कामांमध्ये उपयोगी पडेल व समाजकार्य अधिक सशक्त व सक्षम होईल.
५) सोबत दिलेल्या वधू-वर परिचय फॉर्मच्या नमुना झेरॉक्स अथवा सुवाच हस्ताक्षरात सोबत दिलेल्या व्हॉटस्अप नंबर किंवा इमेलद्वारे email:skmanshit@gmail.com पाठवावेत.

सदर वधुवर परिचय फॉर्म हा ऑनलाईन पध्दतीने सुध्दा भरता येऊ शकतो. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
https://forms.gle/meC9GZpodpX2kTVGA
तसेच काही अडचण येत असल्यास वधुवर परिचय पुस्तक समितीतील सदस्यांना संपर्क साधावा. धन्यवाद

Leave a Reply