पारोळा येथील नगरसेविका सौ. जयश्रीताई बडगुजर यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामे हाती घेऊन प्रभागाचा विकास केला आहे. पारोळा येथील नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदासाठी विशेष बैठक घेण्यात आली. परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या पदासाठी उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना उत्सुकता होती. परंतु नगराध्यक्ष करण पवार यांनी बडगुजर कुटुंबीयांना दिलेला शब्द खरा ठरविला. निवडणूक प्रक्रियेत आज ता. १/१०/२०२० रोजी भाजपच्या जयश्री बडगुजर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपनगराध्यक्षपदी जयश्री प्रवीण बडगुजर यांची निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा तहसीलदार अनिल गवांदे यांनी जाहीर केले. या ऑनलाइन बैठकीस प्रभारी मुख्खाधिकारी विकास नवाळे, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, गटनेते बापू महाजन,महिला बालकल्याण समिती सभापती अंजली पवार, पाणीपुरवठा सभापती प्रकाश माळी, बांधकाम सभापती मनीष पाटील, नगरसेवक मंगेश
तांबे, कैलास चौधरी, भय्या चौधरी, नगरसेविका छाया पाटील, रेखाताई चौधरी, मोनाली राजपूत, अलका महाजन, सुनिता वाणी, वैशाली पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, कैलास पाटील, प्रवीण बडगुजर,
संजय कासार, प्रवीण चौधरी, गौरव बडगुजर, अमोल चौधरी, पालिकेचे
सुभाष थोरात व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सौ. जयश्रीताई बडगुजर यांनी पालिकेचे उपनगराध्यक्षपदाचा पदभार नगराध्यक्ष करणदादा पवार यांच्यामुळे मिळाल्याचे समाधान आहे. आजवर त्यांनी नगरसेवकांच्या सहकार्याने शहराचा विकास साधला आहे. कोरोना काळात देखील पालिकेने चांगली भूमिका निभावली असून, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, पालिका
कर्मचारी व शहरवासीयांच्या सहकार्यानेच मिळालेल्या पदाला न्याय देण्याची आपली भूमिका राहणार असून सर्व समावेशक विकास घडवू. असे नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा जयश्री बडगुजर यांनी सांगितले. सौ. जयश्री ताई यांनी यापूर्वी पालिकेत पाणीपुरवठा सभापती हे पद देखील भूषवले आहे.
सौ. जयश्री ताई बडगुजर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.


Leave a Reply