मूळचे देवकुंड, पिंपरी, एरंडोल, सध्या स्थाईक आहमदाबाद, गुजरात येथील हितेश मोहकर यांचे शिक्षण आमदाबाद येथे झाले. बारावी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर, त्यांनी बीकॉम कॉमर्स चे शिक्षण पूर्ण केले.
ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना, उद्योगाची आवड असणारे त्यानी एक्स्टर्नल कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले. त्यावेळेस त्यांना कॉम्प्युटरचे क्षेत्रला खूप चांगले भविष्य आहे असे जाणवलं.
प्रॅक्टिकल अनुभव घेत असताना ग्रॅज्युएशन च्या प्रथम वर्षीच, विनायक info-tech, कम्प्युटर सेल्स अँड सर्विसेसची स्थापना करून पार्ट टाइम काम करायला सुरुवात केला.
सुरुवातीला छोटी-मोठी कामं मिळवत त्यांनी कंप्यूटर सेल्स अँड सर्विसेस चा बिजनेस स्टार्ट केला. सेकंड इयर ला येता येता त्यांच्याकडे चांगली इन्कम जमा झाली होती. त्या जोरावर एक शॉप भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये आपला बिजनेस उभा करायचा त्यांनी ठरविला.

त्यानंतर त्यांनी विनायक कम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट सूरू केली. इन्स्टिट्यूट सर्टिफाइड केरून पूर्ण गुजरात राज्यात फ्रेंचायसी पॅटर्न राबवून वेगवेगळ्या ठिकाणी फ्रांचाईस दिल्यात.
2015 पर्यंत त्यांच्याकडे गुजरात मध्ये जवळपास 86 फ्रांचाईस होत्या.
डिजिटल क्लासेस ही भविष्याची गरज त्यांनी त्याचवेळेस ओळखली होती. आणि त्यांनी त्या उद्देशाने Mohkar Educom India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून त्याअंतर्गत डिजिटल क्लासेस ची स्थापना केली.
लॉकडाऊन दरम्यान डिजिटल क्लासेस ऑनलाइन प्लॅटफॉर्म ला चांगली मागणी मिळाली. ते बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम स्वतः कंडक्ट करतात. अकाउंट डिझाईनिंग, ॲनिमेशन, फिल्म डिझाईनिंग यांचे ऑनलाइन एज्युकेशन डिजिटल क्लास मार्फत दिले जाते.
त्याच बरोबर बिझनेस डेव्हलपमेंट साठी मॉडेल तयार करून देण्याचे काम प्रत्येक छोट्या आणि मोठ्या इण्डस्ट्रीला करून दिले जाते.
बडगुजर समाजातील विद्यार्थी, तरुण वर्ग, प्रेरणादायी, ह्या जीवन प्रवासात उद्योग व्यवसाय सुरू करताना मार्गदर्शन करण्याच डिजिटल क्लासेस चे संस्थापक हितेश मोहकर यांनी आश्वासन दिले. बिझनेस सुरू करत असताना सर्वात अगोदर ट्रेनिंग घ्या, कुठलाही बिझनेस सुरू करण्याअगोदर त्या बिजनेस मध्ये रिसच आणि डेवलपमेंट करा. नोकरी न करता छोटा जरी असला तरी स्वतःचा बिझनेस सुरू करा असे आव्हान त्यांनी सर्वांना केल.
विद्यार्थी, ट्विटर्स, स्कुल, कॉलेजेस, क्लासेस या सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्म हा वापरता येणार आहे. सर्वांना सामावून घेऊन प्रत्येक वर्गासाठी, हव्या त्या कोर्सचे शिक्षण तुम्ही या प्लॅटफॉर्मवर घेऊ शकतात.
बडगुजर समाजातील विद्यार्थ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देत असताना जवळपास 300 विद्यार्थ्यांना ऑनलाइन एज्युकेशन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल बडगुजर प्राऊड आणि अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती आपले खूप खूप आभारी आहे.
डिजिटल क्लासेस हा एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे यामध्ये कोणीही ( ट्युशन क्लासेस, युट्यूबर, शिक्षक)आपले कोर्सेस उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचा उपयोग विद्यार्थी कोर्सेस विकत घेऊन घरच्या घरी किंवा आपल्या इच्छित ठिकाणी करून ई लर्निंग करू शिकू शकतात.
डिजिटल क्लासेस हे इंडियातील प्रथम ई लर्निंग मार्केट प्लेस आहे. आत्तापर्यंत 23 टक्के बिजनेस इंटरनॅशनल आणि 77 टक्के बिझनेस इंडियन आहे.
या प्लॅटफॉर्मवर आपण केजी टू कॉलेज, आयटी सॉफ्टवेअर, मॅनेजमेंट, फॉरेन लांग्वेज, इंजिनिअरिंग सब्जेक्ट, गव्हर्मेंट प्रिपरेशन कोर्स ई. आणि असे बरेच काही शिकू शकतात. सर्व प्रकारचे कोर्सेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
http://www.digitalclassworld.comhttp://www.tutor.digitalclassworld.com
डिजिटल क्लासेस, Mohkar Educom India प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आलेख असाच भविष्यात उंचावत जावो आणि यशाच्या सर्वोच्च ठिकाणी आपण पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद.


श्री. हितेषजी मोहकर ,या धडपड्या तरुणांच्या यशाची कथा ही रोचक आहे.त्यांच्या हिम्मतीचे
कौतुक व अभिनंदन !
त्यांना वाढ दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा !
यशस्वी भव :!
Thanks sir ,to share your experience and Courses to student.