धुळे महानगर( शहर) विज्ञान व गणित अध्यापक संघ नूतन कार्यकारिणी जाहीर,दादासो.श्री.के.सी.साळुंखे सर यांची महानगर अध्यक्ष पदी अभिनंदनीय निवड : श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ संलग्न धुळे महानगर विज्ञान व गणित अध्यापक संघाची नुकतीच कार्यकारिणीची पुनर्रचना करून नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आपले मित्र,सतत हसतमुख,मनमिळावू स्वभाव, सहकार्य भावना असणारे श्रीमती सिताबाई शंकर माळी कन्या हायस्कूल,देवपुर,धुळे येथील उपशिक्षक दादासो. श्री.के.सी.साळुंखे सर यांची धुळे महानगर विज्ञान व गणित अध्यापक संघटनेच्या महानगरपदी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
श्री. के. सी. साळुंखे सर हे धुळे येथील जेष्ठ समाजसेवक प्रा. सी. डी. साळुंखे सर यांचे चिरंजीव आहेत. वडिलांप्रमाणेच के. सी. सर हे आपल्या शैक्षणिक क्षेत्रात तत्पर सेवा देत असतात. त्यांची अध्यक्षपदी निवड ही अभिनंदनीय असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

नूतन कार्यकरिणीतील अध्यक्ष पदी निवड झालेल्या श्री. के. सी. साळुंखे सर (बडगुजर) यांचे अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

दादासो. श्री. के. सी. बडगुजर सर, धुळे

1 Comment

  1. किरणचंद्रदादा हार्दिक अभिनंदन व भावी भरीव कामगिरीस कोटीकोटी शुभेच्छा तथा आशिर्वाद.यापूर्वी तू गणित व विज्ञान परीषदेवर कार्यवाह ची भुमिका यशस्वीपणे पूर्ण केली आहेच,त्याही पेक्षा नवीन जबाबदारी महत्वाची आहे.
    *”यशस्वी भवः- विजयी भवः – शुभम् भावतुः!”*

Leave a Reply

Your email address will not be published.


*