धुळे शहरातील नामवंत पहिलवान श्री, आनंदा शेठ सुर्यवंशी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे मा. अध्यक्ष, समाज भुषण श्री. आनंदाभाऊ धोंडु सुर्यवंशी (अध्यक्ष, क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था धुळे.) जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या धुळे जिल्हा जेष्ठ मार्गदर्शकपदी व श्री. संकेत सुर्यवंशी यांची धुळे जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली.

श्री. आनंदा शेठ धोंडू सुर्यवंशी (अण्णासाहेब) हे समाजातील प्रमुख आणि महत्वपूर्ण नेतृत्व आहे. धुळे विभागात पैलवान आणि मल्लविद्या या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि यामुळेच त्यांचे या क्षेत्रात पंचक्रोशीत आणि समाजात एक वेगळीच ओळख आहेत. अण्णांनी बरेचसे युवा वर्गाला या क्षेत्रात मार्गदर्शन करत त्याना यश प्राप्त करून दिले आहे. आपले कार्य आपण करत जावे यश हे आपल्या मागे नक्की येत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णासाहेब होत. आणि समाजातील युवावर्गाला यातून नक्कीच आदर्श घेता येईल.
बडगुजर समाजातील धुळे येथील बडगुजर समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व व युवक नेतृत्व अश्या दोन्ही कुशल नेतृत्व यांची सदर पदासाठी नियुक्ती झाल्याबद्दल अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.


श्री.आनंदाभाऊ सुर्यवंशी व श्री. संकेत सुर्यवंशी
( धुळेकर ) ,यांची कुस्तीगीर परिषदेवर मार्गदर्शक व संघटक पदी झालेल्या निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन !