༻✾✿❀ “तयारी जिंकण्याची” ❀✿✾༺
नमस्कार समाजबांधवांनो,
बडगुजर प्राऊड ग्रुप निर्मित आणि अ. भा. ब. स. युवक समिती च्या अनमोल सहकार्याने सुरू असलेले डिजीटल व्यासपीठ www.badgujar.in बडगुजर वेब पोर्टल च्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करीत आहोत
आपण बडगुजर प्राऊड ग्रुप आणि अ. भा. ब. स. युवक समितीच्या अनमोल सहकार्याने परत एकदा आपल्यासाठी एक अनोखा उपक्रम घेऊन येत आहोत.
आम्ही आपल्या समाजातील युवकांच्या / तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी, युवकांना उद्योग व्यवसाय कसा करावा/कुठला करावा त्यासाठी लागणारे साहित्य /भांडवल एक यशस्वी व्यावसायिक / व्यवसाय कसे व्हावे /करावा. तसेच बाजारपेठेतील व्यावसायिक संधी याबाबत तज्ञ उद्योजक मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन आयोजित करणार आहोत.
तसेच त्या पार्श्वभूमीवर आपण आता बडगुजर समाजातील ५ यशस्वी युवा उद्योजक यांना प्रसिद्ध बिझनेस कोच श्री. सुनिल जाधव सर यांच्या E2E (कर्मचारी ते उद्योजक) या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत. आपलेच समाज व्यवसायात कसे यशस्वी झाले त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा व्हिडीओ इंटरव्ह्यू आपल्या बडगुजर चॅनेल च्या माध्यमातून LIVE प्रकशित करणार आहोत.
इंटरव्ह्यू संकलन : श्री. सुनिल जाधव सर

तसेच इतर क्षेत्रातील आणि समाजातील उद्योजकांना पण आमंत्रित केले आहे.
ह्या अतिशय प्रभावशाली आणि प्रक्टिकल प्रोग्राममुळे तुम्ही आयुष्यात झटपट निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची मानसिकता बनवाल आणि प्रत्येक क्षेत्रात विजयी व्हाल.यामुळे तुम्ही नेहमीच संधी शोधाल आणि तिच्यावर झडप घालून अतिशय आश्चर्यकारक परिणाम मिळवाल.

सदर उपक्रमास सर्व समाज मंडळांनी सहकार्य करावे. सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. धन्यवाद.
तसेच ज्यांना उद्योजक, व्यापार व्यवसाय करावयाची इच्छा आहे. अशा सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करावी तसेच कार्यक्रम कसा घ्यावा या विषयी आपले मत खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून कळवा. या कार्यक्रमातून आपल्या समाजातील युवापिढी ला एक नविन यशाचा मार्ग दाखवू या.
https://forms.gle/zbhYKNLVnp7Vq6Tb6
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. विजय बडगुजर – 7499551750
श्री. संदीप कोतवाल – 9881717133
श्री. लोकेश कोतवाल – 7030755996
बडगुजर वेब पोर्टल टिम
?जय बडगुजर सेना?


Leave a Reply