जि.प.शाळा,चिंचगव्हाण ता.मालेगाव, जि.नाशिक येथील शिक्षक,आई प्रतिष्ठानचे संचालक,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मालेगाव तालुका उपाध्यक्ष श्री.परेश चुडामण बडगुजर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन "दैनिक बालेकिल्ला समर्थ प्रतिष्ठान तर्फे" "समर्थ शिक्षक पुरस्कार"देऊन गौरवण्यात आले.
हॉटेल ग्रॅन्ड न्यू सविता, मालेगाव येथे आखिल भारतीय हिंदू रक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता पाटील गागरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,दिनदर्शिका,स्मृती चिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
श्री.परेश चुडामणशेठ बडगुजर (रा.अमळथे ता.शिंदखेडा ह.मु.सोयगाव,मालेगाव) हे श्री.चुडामण लोटनशेठ बडगुजर (रा.अमळथे ह.मु.शिंदखेडा) यांचे चिरंजीव आहेत.श्री.सुभाष पंडितशेठ बडगुजर (साकळी) यांचे जावाई आहेत.श्री.शांताराम भिकाशेठ बडगुजर(कल्याण) व श्री.प्रमोद सुरेशशेठ बडगुजर(उमरगाव) यांचे शालक आहेत.

श्री.परेश चुडामण बडगुजर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे बडगुजर प्राऊड ग्रुप व अ. भा. ब. स. युवक समिती तर्फे हार्दिक अभिनंदन.


Leave a Reply