एक अनोखी कला उपासक – सौ. रोहिणी रविंद्र बडगुजर, शहादा आणि कलेतून सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणा देणारे दाम्पत्य – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

खरेतर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कलेची आवड असतेच. परंतु आपण त्या कलेचे उपासक बनले पाहिजे. हे सौ. रोहिणी रविंद्र बडगुजर यांनी साकारलेल्या विविध गणेश मूर्ती मधून आपणास कळते. लहानपणापासूनच मातीमध्ये खेळणाऱ्या ताईंना मोठेपणी सुद्धा या मातीचा लळा लागला. भातुकलीच्या खेळामध्ये अनेक प्रकारची मातीची भांडी स्वतः बनवून खेळणारी लहान मुले बघितल्यानंतर आपल्यासारख्यांना त्याचे कुतूहल वाटते. पर्यावरण पूरक अशा शाडू माती पासून सुरुवातीला त्यांनी गणेश मूर्ती साकारली. मात्र मोठी मूर्ती तयार करण्यासाठी केवळ शाडूमाती पुरेशी नव्हती हे अनुभवाअंती त्यांना कळले. म्हणून पुढील वर्षी त्यांनी या शाडूमाती मध्ये कागदाचा लगदा मिसळून मूर्ती तयार केली. मुर्तीचे पावित्र्य राखले जावे म्हणून सुरुवातीपासून ते आजपर्यंत मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनांमध्ये पंचामृत पंचगव्य गंगाजल गुलाब जल या वस्तू कायमस्वरूपी ते वापरत असतात. यावर्षीच्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अनेक नव कल्पना राबवण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यातूनच शाडू माती, कागदाचा लगदा, नारळाच्या कपच्या, गीर गायीचे शेण, लाकडाचा भुसा, मीठ, व तुरटी पावडर यापासून एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत गणेश मूर्ती साकारण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले.

सौ. रोहिणी ताई गणेश मुर्ती रंगवितांना

आपण शिकलेली ही कला दुसऱ्यांनाही शिकवता आली तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल ही जाणीव झाली. म्हणून सौ रोहिणी ताईंनी कार्यशाळा राबविण्याचे ठरवले. यासाठी सराव म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. लहान बाळ गोपाळ यांना घरच्या घरी गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यामुळे आत्मविश्वास प्राप्त झाला. पुढील काळात कोणतीही फी न घेता त्यांनी शाडू मातीचा गणपती बनविण्याच्या कार्यशाळा विविध ठिकाणी आयोजित केल्या. यावर्षी कोरोना महामारी चे संकट असल्यामुळे प्रत्यक्षात त्यांना कार्यशाळा घेता आली नाही. परंतु घरी राहूनच स्व निर्मितीचा आनंद घेत गणराया निर्मिती करावी यासाठी त्यांनी ऑनलाइन व्हाट्सअप व्हिडीओ तसेच यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांना आव्हान केले व कार्यशाळा राबवली. शाडू माती पासून गणपती निर्माण करण्याचे प्रशिक्षण अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांच्या माध्यमातून सुद्धा एक दिवस कार्यशाळा राबवून त्यांनी समाजाच्या लोकांपर्यंत आपली कला पोचविली.

सौ.रोहिणी ताईंनी ही कला केवळ आपल्याकडे न ठेवता ती इतरांना देऊन अनेकांना आपले शिष्य बनविले. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या कार्यशाळांमधून श्रीगणेशाच्या अनेक कलाकृती बरोबरच अनेक कलाकार सुद्धा घडले. आत्मनिर्भर झाले. यामुळेच त्यांचे शिष्य आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ही बाब त्यांच्यासाठी व सर्वांसाठी आनंदाची समाधानाची आणि महत्त्वाची वाटते. आज त्यांचे शिष्य अनेक ठिकाणी कार्यशाळा घेऊन त्यांचा हा वारसा पुढे नेत आहेत.
ताईंची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आतापर्यंत त्यांनी या कलेतून मिळवलेल्या पैशांचा विनियोग, सदुपयोग व सत्कार्यासाठी केलेला आहे. हजार व लाख रुपयां मधला फरक जरी खूप मोठा असला तरी, त्यांची ही समाजसेवा आजही सुरू आहे. यावर्षी सुद्धा गणेश निर्मिती तून जमा झालेला निधी पैसा त्यांनी स्वतःसाठी कुटुंबासाठी न वापरता, जीवन सन्मुख ज्ञानसाधना म्हणजेच जिज्ञासा फाउंडेशनला ही रक्कम समर्पित केली.देणगी म्हणून दिली. या मागचे समाधान व्यक्त करताना ताई म्हणतात , ” हे आमचे समर्पण नसून आमच्या समाधानी ग्राहक राजांची तद्वतच गणपती बाप्पाचे हे समर्पण आहे.”
त्यांच्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने उच्च श्रीमंत, सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. श्री शैलेश पटेल, श्री कल्पेश पटेल, श्री निलेश खंडेलवाल, श्री राजेश पटेल, श्री मिनेश पटेल, श्री हितेश पटेल, प्राध्यापक श्री रवींद्र रघुवंशी, श्री भगवान बडगुजर, श्री मनोज पाटील, श्री दीपक भोई (ढोले सर ),तसेच पतंजली सार्वजनिक नगर मित्र मंडळ शहादा यांचा समावेश आहे. सर्वांची नावे याठिकाणी घेणे शक्य नाही परंतु बरीचशी सहकारी मंडळी पर्यावरण पूरक शाडू माती पासून बनविलेल्या गणेश मूर्तींची स्थापना करत असतात.

            आपल्या या कलेचा वारसा त्यांच्या घरातील चि.मनन व कु. नंदिनी ही बाल मंडळी सुद्धा नक्कीच पुढे चालवतील असे वाटते. कारण त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना त्यांचे पती श्री.रवींद्र मोहन बडगुजर व लहान मंडळी मदत व मोलाची साथ देत  असतात. संपूर्ण घर, कुटुंब हे गणरायात रंगले असल्याचे पहावयास मिळते. लहान बाळ गोपाळ आपल्या लहान हातांनी गणरायाच्या या मुर्त्या रंगवीत असतात. भविष्यकाळात यापेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणात गणेश मुर्ती निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा 
  शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण व्हिडिओ यूट्यूब चैनल वरती समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहून त्याला लाईक कॉमेंट शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका ही सौ.रोहिणी ताई कडून सर्वांना विनंती. त्यांच्या या कार्यात समाज या नात्याने आपण सुद्धा हातभार लावावा ही विनंती.
सौ. रोहिणी व श्री. रविंद्र बडगुजर परिवार

2 Comments

  1. सौ.रोहीनीताई व श्री.रविंद्र भाऊ यांचे गणपती मुर्ती कार्यशाळा मुळे आम्ही देखील घरी मातीची गणपती मुर्ती स्वत:घडवुन खरा आनंद लुटला. तो शब्दात वर्णन करणे अशक्यप्राय. कार्यशाळेमुळे सविस्तरपणे कला अवगत करता आली. बर्याच दिवसांची स्व:हस्ते गणपतीची मूर्ती बनविण्याची सुप्त ईच्छा पुर्ण झाली.

Leave a Reply to Yashwant Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*