भाटपुरा, ह. मु. चोपडा येथील समाज बांधव श्री. योगेश मनोहर जाधव सर ( शिक्षक) यांनी नुकतीच एक काव्यलेखन करून प्रसारित केले आहे. सर हे मुळचे भाटपुरा येथील रहिवासी सौ. विद्याबाई व श्री. डॉ. मनोहर काशिनाथ जाधव यांचे जेष्ठ चिरंजीव आहे. सध्या ते चोपडा येथे राहत असून जि.प. उच्च प्राथ.शाळा माचला ता. चोपडा येथे २००६ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी एम.ए. डि.एड्. पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. आणि त्याना लिखाणाची आवड ही शालेय जीवनापासूनच आहे. श्री. जाधव सरांना आधीपासूनच वाचनाचा छंद असल्या कारणांमुळे सरांची शब्दांची ओळख आणि संग्रह भरपूर आहे. शब्दप्रयोग करतांना कुठे कसा कुठला शब्द उपयुक्त ठरून त्या वाक्याचा अगदी सहज अर्थ कळेल अशा पध्दतीची मांडणी आणि धार सरांच्या लिखाणात आहे.
सरांनी नुकतीच एक कविता लिखाण केली आणि प्रथमतःच तिचे शब्दांकन केले. शब्दांची अतिशय सुंदर मांडणी आणि त्याहीपेक्षा अधिक अप्रतिम असे वर्णन केले आहे. या कवितेचे नांव आहे “जप्ती”. सदल कवितेचे सरांच्या मधुर आवाजात वर्णन करणारा व्हिडीओ आपल्या साठी खाली दिलेल्या लिंकवर अपलोड केला आहे.
आपल्या जर ही कविता आवडली तर लाईक करा, शेअर करा.
सरांनी २०१५ साली रुद्रधारा (काव्यसंग्रह) नावाचे पुस्तक ही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला सन २०१५ मध्ये तापी-पूर्णा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते प्राप्त झाला.
तसेच ऑक्टोबर २०१५ मध्ये सरांना आकाशवाणी जळगांव येथे युवावाणी सदरात कार्यक्रम सादर.
सन २०१६ मध्ये ८९व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनात कवीकट्टाच्या मंचावर कविता सादर करण्यास निमंत्रण.
पुरुष उवाच, चपराक यांसारख्या अनेक प्रथितयश दिवाळी अंकांतून लेखन.
असा साहित्याच्या अंगाचा हा सरांचा अल्पसा परिचय!
श्री. जाधव सर, आपण अजून नवनवीन कविता आणि लेख आपण प्रसिद्ध कराल याची प्रतिक्षा असेल. बडगुजर समाजात आपणा सारखा साहित्यिक व्यक्तिमत्त्व आहे ही आनंदायी बाब आहे आणि नक्कीच आपण या क्षेत्रात उंच भरारी घ्याल ही सदिच्छा. आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply