धरणगांंव येथील चि.सागर प्रभाकर बडगुजर यांनी दाखवलेल्या धाडस व प्रामाणिकतेबद्दल त्यांचा बडगुजर समाज पंच मंडळातर्फे सत्कार – चि.गणेश सुरेश कोतवाल व चि.रोहित मनोहर बडगुजर, धरणगांव

चि.सागर प्रभाकर बडगुजर हे मूळचे धरणगाव येथील रहिवासी असून ते महावीर पतसंस्था धरणगाव येथे शिपाई म्हणून कामाला आहेत. सदर पतसंस्थेतील व्यवस्थापक यांनी दुपारी 4 वाजता चि. सागर यास अर्बन बँकेत सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी पाठवले. चि.सागर हे भरणा करण्यासाठी धनगर गल्लीतुन जात असतांना समोरुन तोंड बांधून आलेल्या अनोळखी व्यक्तिंनी त्यांचा समोर गाडी थांबवली. या दोन अनोळखी व्यक्तिंनी मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्या जवळ असलेल्या हत्याराचा वापर करून डोळ्याजवळ मारहाण केली. चि.सागर यांचा जवळ असलेल्या 2 लाख 11 हजार रुपयांचा भरणा असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र चि.सागर यांनी पिशवीला हिसका देऊन अर्बन बँकेत भरणा करण्यासाठी धाव घेतली.

तसेच भरणा झाल्यानंतर चि.सागर यांनी उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली व पोलीस स्टेशनमध्ये सदर घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. चि.सागर प्रभाकर बडगुजर यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल व प्रामाणिकतेबद्दल धरणगाव येथील बडगुजर समाज पंच मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बडगुजर पंच मंडळातील पदाधिकारी व समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चि. सागर बडगुजर यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल महावीर पतसंस्था येथील चेअरमन व सर्व स्टाफ तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

चि.सागर प्रभाकर बडगुजर याचा सत्कार करतांना युवा कार्यकर्ते




Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*