गणेशोत्सव निमित्त श्री. गणेश बडगुजर यांचे गणेश भक्तांसाठी “गणपती नवसाला पाव” हे नविन गाणे रिलीज – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

यावर्षी कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने आणि काळजीपूर्वक साजरा केला जातोय. या परिस्थितीची जाणीव ठेवत आपले समाजातील गीतकार, संगीत विशारद श्री. गणेश भास्कर बडगुजर यांनी गणपती साठी गणपती नवसाला पाव हे गाणे आपणा सर्वांसाठी युट्यूब व्दारे प्रकाशित केले आहे.

श्री. गणेश बडगुजर हे यावल येथील रहिवासी असून त्यांनी B. A. Music (संगीत विशारद) केले आहे. ते सध्या जे. टी. महाजन कॉलेज, फैजपूर येथे संगीत शिक्षक आहेत व स्वतः ते म्युझिक कम्पोजर, डायरेक्टर तथा गायक आहेत.

याआधीही श्री. गणेश बडगुजर यांनी नवरात्री मध्ये चामुंडा मातेचे भक्तीभाव पुर्ण गीत गायले होते व ते सुपरहिटही ठरले. यावेळी गणेशोत्सव चा निमित्त साधून त्यांनी हे गाणे तयार केले आहे.

त्यांनी स्वतःच हे गाणे डायरेक्ट केले व गायले सुध्दा आहे. मल्टीटास्किंग व्यक्तीमत्व श्री. गणेश बडगुजर सर यांच्या युट्यूब Chanel ला आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करावे.

गणपती नवसाला पाव
(हे रिद्धी – सिद्धीच्या महागणपती देवा…) 

गणेश बी. बडगुजर यांनी गायलेले 
गणेशोत्सव २०२० चे नवीन हिट मराठी युट्युब सॉंग!

नक्की पहा आणि सर्वांना शेअर करा…!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*