मुंबईतील प्रामाणिक पोलिस अधिकारी – श्री. रमेश वामन बडगुजर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. मोहनशेठ यांचे मनोगत

ll श्री ll

मुंबईतील प्रामाणिक पोलिस अधिकारी
आमच्या धुळे येथील कृष्णा पीतांबर बडगुजर यांचे पुतणे वामन हलवाई यांचे सुपुत्र त्याकाळात सर्वोच्च नामांकित पीएसआय या पदावर श्री.रमेश वामन बडगुजर यांनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी प्राप्त केली मुंबईतील पोलीस डिपार्टमेंट मध्ये विविध पदावर यशस्वीरित्या प्रामाणिकपणे, शांतपणे सेवा करीत करीत महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त(ACP) म्हणून काही काळ राहिली. व त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे मंत्रालयाची सुरक्षा पार पाडली. या वेळात बडगुजर समाजाचे ओबीसीचे काम आम्ही हातात घेतले होते. सतत मंत्र्यांना भेटावे लागत होते व हे रमेश शेठ यांच्यामुळे शक्य होत होते. मंत्रालयात काम करीत असतानाच त्यांची
सेवानिवृत्ती झाली. त्यांच्या पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयात माझेही मनोगत झाले. तसे पाहिले तर माझ्या आठवणीत रमेश शेठ यांच्या खूप आठवणी आहेत. त्यांच्या डिपार्टमेंट मधील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व राजकीय मोठे नेते त्यांना विचारात की मोहन बडगुजर तुमचे कोण? व मलाही आमदार, खासदार, मंत्री व पोलिस अधिकारी विचारत की रमेश बडगुजर तुमचे कोण? आम्ही दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होतो परंतु कामामुळे सर्व ठिकाणी आमची छाप आहे. रमेश शेठ पोलीस डिपार्टमेंट च्या वरिष्ठ पदावर असूनही कुठल्याही प्रकारचा गर्व, अभिमान, स्वार्थ त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे कुठलाही समाजबांधव त्यांच्याकडे गेला तर ते हिरीरीने, आपलेपणाने त्याची विचारपूस करत. ते काही खूप छोटेखानी काव्य लेखन, व कविता सुद्धा करतात. त्यांचे पोलीस शिपाई मला नेहमी त्यांचे वेगवेगळे किस्से सांगत असत. पोलीस डिपार्टमेंट मध्ये असून सुद्धा आमच्यासोबत उत्कर्ष मंडळ, पाक्षिक बडगुजर दर्शन, ओबीसीचे काम अथवा समाजाच्या सुख दुःखाच्या प्रसंगात आमच्याबरोबर ते सतत काम करत आहेत. असे प्रामाणिक, निस्वार्थी समाजसेवक यांचा अनेक वेळा आपल्या समाजाकडून गौरव ही करण्यात आला. आम्ही धुळे ते मुंबई व्हाया ठाणे पर्यंत सोबत आयुष्याचा प्रवास करीत आहोत. व त्याचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा. ना. रवींद्रजी चव्हाण श्री. रमेश वामन बडगुजर व श्री. मोहन हिरालाल बडगुजर छायाचित्र दिसत आहेत.

त्यांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धी, निरोगी सर्वांना बरोबर घेऊन प्रेम करीत जावे. हे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती च्या वतीने जाहीर रित्या शुभेच्छा देत आहोत.
अध्यक्ष-श्री. मोहन हिरालाल बडगुजर,
उपाध्यक्ष- श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर
उपाध्यक्ष- श्री.हरिश्चंद्र साबाजी बडगुजर
सेक्रेटरी- श्री.घनश्याम रामदास अलोने,
सचिव- श्री.राजेंद्र बापू बडगुजर,
सचिव- श्री.ज्ञानेश्वर मोरडीया,
खजिनदार- श्री.महेश रामकृष्ण बडगुजर,
संघटक- श्री. प्रकाश बबन बडगुजर,
श्री.विजय श्रीधर बडगुजर
श्री.किशोर सहादु बडगुजर
डॉ. अतुल साहेबराव बडगुजर,
श्री.आशिष पितांबर बडगुजर,
श्री.कृष्णा धोंडू बडगुजर,
श्री.राजेंद्र धनजी बडगुजर,
श्री.आर डी चव्हाण,
श्री.आर बी चव्हाण,
श्री.भगवान शंकर बडगुजर,
श्री.उमेश बडगुजर,
श्री.आर आर बडगुजर,
श्री.मदन कौतिक बडगुजर,
श्री.बापू किसन बडगुजर,
श्री.संतोष वसंतराव बडगुजर,
श्री. विठ्ठल श्रावण मोहकर
(सेवानिवृत्त)DYSP
श्री.बाळू मोहन बडगुजर,
श्री.निंबा तंगा भिलाडे
श्री.दिलीप बडगुजर,
श्री.गणेश फकीरा बडगुजर,
श्री.लोकेश कोतवाल व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*