“उत्कृष्ट सेवा” – सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या कडुन गौवरण्यात आले व बडगुजर समाजास प्रेरणादाई – श्री. विनोद मोहकर पुणे

सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर हे भातखेडे येथील रहिवासी असुन, त्यांचे माहेर चोपडा आहे. व त्या श्री. राजेन्द्र, सुधीर, शिरीष, व रतीलाल बडगुजर या भांवडाची बहीण आहे. सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर यांना तीन मुलं आहेत मोठा मुलगा हा एसटी महामंडळ येथे कंडक्टर, दुसरा मुलगा हा भडगांव हायस्कुल मध्ये क्लर्क आहे, व लहान मुलगा यांचे बी. ए. पर्यत शिक्षण झाले आहे.

विशेष सांगावेसे वाटते की सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर ह्या माजी सरपंच होत्या. आपला संसार करत असताना आपणही समाज कार्य करू शकते व त्या साठी त्यांनी गावातील गावकरांच्या त्यांच्या अडचणी, समस्या, ह्या जाणुन घेतल्या व त्या पद्धतीने त्यांचे निर्मुलन व कार्य करत राहिले. सरपंच काळात त्यांनी सरकारने राबविलेल्या स्मार्ट ग्रामीण योजनेत भाग घेतला व त्यांनी पुर्ण विचार, योजनेचे फायदे सांगितले, व त्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्याने त्यांना त्यांच्या गांवासाठी पुरस्कार व 10 लाख रुपये मिळाले. तसेच समाज कार्य हे करत असत. एके काळी सन 2017 मध्ये त्यांच्या गावात भीषण दुष्काळ पडला पिण्यासाठीही पाणी नव्हते तर त्यांनी परीस्थिती बघितली व क्षणाचाही उशीर न करता त्यांच्या विहिरीचे पाणी हे एक गांव नाही तर दोन गांवना पिण्यासाठी विनामुल्य पाणी उपलब्ध करून दिले व यावर त्यांनी मात केली व यात पाठबळ दिले ते त्यांचे पती श्री. ज्ञानेश्वर पुंडलिक बडगुजर यांनी ते शेती करून, ते एका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा आहेत. ते प्रत्येक वेळेस पुढाकारणे आपल्या पत्नी ला सल्लागार, व अडचण असेल त्या सोडवण्यासाठी मदत करतात.


कोरोना काळात त्यांनी प्रत्येक नियमांचे सोशल डिस्टगिंग,मांस, हॅन्डगोल्ज, सॅनिडायझर यांचा काटेकोरपणे पालन करत असताना जन जागृती करून – स्वस्त धान्य रेंशनिग दुकानातुन रेशन कार्ड असलेल्या व्यक्तीस नियोजन व नियमाने पुरवठा हा केला व यांत त्यांचा लहान मुलगा गौरव बडगुजर यानेही अमुल्य अशी मदत केली या कार्याची दखल घेऊन सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर यांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या कडून सन 2019-2020 महसुल विभागाच्या महसुल दिनानिमित्त सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानादार “उत्कृष्ट सेवा” कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले व तसे प्रस्थती पत्र ही देण्यात आले.
सलाम त्यांच्या या कार्याला !
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व बडगुजर युवा संघटन सुरत, व महिला ग्रुप ?जय चांमुड़ा माता हिरकणी? यांच्या कडून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन, त्यांच्या समाज कार्याला, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ?? ?

श्री. ज्ञानेश्वर पुंडलिक बडगुजर – 9049033324
सौ. शोभा ज्ञानेश्वर बडगुजर – 9371391202

1 Comment

  1. सौ . शोभाताई आपले कार्य वाखाणण्यासारखे आहे . रेशन दुकानांत भ्रष्टाचार करणारेच जास्त सापडतात , आपण निस्वार्थपणे सेवा केली त्याचे फळ आपणांस मिळाले , शेतीचे पाणि २ गावांना देऊन आपण फार पुण्यांचे काम केले आहे . लोक. पाणीसुध्दा विकतात . अशीच सेवा आपल्या हातून घडत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
    आपले हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*