श्री. मनोज भिकनशेठ बडगुजर डोंबिवलीकर यांना कोरोना झाला होता आणि त्यांची तब्येत बिघडली होती. सुरुवातीला त्यांना कल्याण टाटा आमंत्रण हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु काहीही फरक पडला नाही. मग त्यावेळेस मी, श्री.आर. डी. चव्हाण तसेच श्री.एस एम. बडगुजर यांनी श्री. मोहन शेठ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की, आपल्या ओळखीने कुठे त्यांना बेड मिळत असेल तर बघा. लगेच त्यांनी
त्यांच्या राजकीय ओळखीने त्या विभागातील नगरसेवककाकडे माझा नंबर दिला मी त्याच्याकडे रिपोर्ट पाठवला आणि पटकन नगरसेवकाने तातडीने पुढील कारवाई केली आणि पंधरा मिनिटातच त्यांनी डोंबिवली येथील पाटीदार या हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून दिला.
श्री. मोहन शेठ हे स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात होते. तेथील डॉक्टरांनी जातीने लक्ष देऊन त्यांच्यावर उपचार चालू केले आणि आज
श्री. मनोज भिकन बडगुजर हे सुखरूप कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन घरी आले.
खरोखर श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. याच प्रकारे आपल्या अनेक समाज बांधवांना त्यांनी अशी वैद्यकीय मदत केलेली आहे व करत आहेत म्हणून त्यांचे लाख लाख आभार.
मनोज नंदवालकर
कल्याण पश्चिम

Leave a Reply