देवधुत (कोरोना योद्धा) चा सत्कार व बडगुजर समाजासाठी अभिमान असे श्री. सागर बडगुजर हे चोपड़ा येथील रहिवासी आहेत. यांचे कार्य हे अतुलनीय आहे यांची प्रशंसा केली तरी ती कमी पडेल. त्यांचे कार्य ते विना मोबदला, कुठलीही आशा न बाळगता ते अविरत पण हे समाज कार्य करत असतात. श्री. सागर बडगुजर हे सर्पमित्र ही आहेत. कोरोनाच्या सकंट काळात महारास्ट्रा बाहेरील मृत व्यक्तिस त्यांचे नातेवाईक नसताना त्यांची अंतविधि साठी कोणोहि नातलग नाही ही बातमी श्री. सागर बडगुजर यांना समजले लगेचच तात्काळ त्या मयत व्यक्तिचि अंत्ययात्रा ही सिव्हिल हॉस्पिटल चोपड़ा ते स्मशानभुमी केली व त्यावर अंत्यसंस्कार केले.

त्यांची स्वताची रुग्ण वाहिका आहे व ते चालक आहे. तत्परतेने रुग्णांना मोठ्या हॉस्पिटल पर्यत पोहचविने ने आण करणे, संकट काळी वाहन बंद असले की स्वर्ग रथ मधुन पोहचवणे. कोरोना काळात जेव्हा माणूस आजारी पडतो. तेव्हा ते स्वतः माणुसकीच्या नात्याने रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना सिव्हिल रुग्णांलयात किंवा दुसऱ्या रुग्णांनालायत दाखल करणे व त्यांना वेळोवेळी धीर देणे व कोणी कोरोना असलेली व्यक्ति मृत्यु नंतर रुग्णांचे नातेवाईक नाहीत, किंवा नातेवाईक समोर येत नाही अशा वेळी स्वतः पीपीई किट घालुन अंतिम संस्कार ही करत असत.
या काळात समाजातुन, मित्र, यांच्या कडून वर्गणी गोळा करुण किंवा घरी जेवणाचे डबे बनवुन कोरोना रुग्ण किंवा ज्या व्यक्तिना अन्न हे मिळत नव्हते त्यांना मदत केली. या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धाचि जलगांव येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स तर्फे हार्ट ऑफ गोल्ड या माध्यमातुन त्यांचा सत्कार केला.

सलाम त्यांच्या या अवितरपणे कार्याला !
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप यांच्या कडून श्री. सागर बडगुजर यांचे अभिनंदन ??
श्री. सागर बडगुजर – 9922727172


Leave a Reply