नमस्कार मंडळी,
सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करण्याच्या तयारीत असालच… यावर्षी कोरोनाचे सावट आहे ते लवकरच दूर व्हावे यासाठी आपण बाप्पाला प्रार्थना करू या…
चला तर मग… आपल्या घरातील, सोसायटी, गल्ली अथवा मंडळातील गणपतीला आपल्या समस्त समाजापर्यंत पोहोचवूया …
अ. भा. ब. स. युवक समिती , बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.in वेब पोर्टल आपल्या साठी घेऊन येत आहे एक अनोखी स्पर्धा…
१. सेल्फी विथ बाप्पा :
यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील, सोसायटी, गल्ली अथवा मंडळातील गणपतीसोबत
आपला आणि आपल्या परिवाराचा सेल्फी/फोटो पाठवायचा आहे. फोटो सहित स्वतःचे नांव, गावाचे नांव पाठवायचे आहे.
प्रत्येक स्पर्धकाचा फक्त एक फोटोच ग्राह्य धरण्यात येईल.
सर्व स्पर्धकांचे फोटो www.badgujar.in वेब पोर्टलवर दाखविण्यात येतील.
? उत्कृष्ठ ३ फोटोंना बक्षीस देण्यात येईल.
सदर स्पर्धेचे प्रायोजक हे ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश बडगुजर हे आहेत
टीप : स्पर्धेसाठी फोटो निवडतांना फोटो क्वालिटी, प्रकाश, स्पर्धकांचे वेशभूषा, हावभाव इत्यादी लक्षात घेतले जाईल.
२. मखर सजावट स्पर्धा :
घरातील गणपती सजावट स्पर्धा :
फक्त स्वतःच्या घरातील गणपतीचे मखर सजावटीचे फोटो स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत. तुमच्या घरातील गणपती सोबत काढलेला सर्व कुटुंबाचा फोटो आणि फक्त मखर /सजावटीचा वेगळा असे २ फोटो पाठवायचे आहेत.
टीप : स्पर्धेसाठी फोटो निवडतांना मखरासाठी वापरलेले साहित्य, कल्पना , प्रकाशयंत्रणा , संदेश या गोष्टी ध्यानात घेतल्या जातील.
गणपती व सजावटी सोबत घेतलेला फोटो व फक्त सजावटीचा वेगळा असे २ फोटो पाठवायचे आहेत.
? महत्त्वाची सुचना : कोरोना विषयी नियमांचे पालन करून आपण सदरील फोटो काढावेत. कोणीही नियमांचे उल्लंघन करून फोटो पाठविला तर तो बाद ठरविण्यात येईल.
वरील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता कृपया खालील नंबरवर व्हाट्सअप ने संपर्क करावा :
१) श्री. विजय बडगुजर – 9921107169
२) श्री. धिरज बडगुजर सर – 9767568365
३) श्री. दिनेश बडगुजर – 7709729143
४) श्री. दिलीप बडगुजर – 9922335555
५) श्री. रमाकांत बडगुजर – 9890562720
स्पर्धेचा कालावधी : दि. २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२०.
धन्यवाद.
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
वेब पोर्टल टिम

Leave a Reply