दोन लाखाचा भरणा घेऊन जात असलेल्या सागर बडगुजर च्या प्रसंगावधाने लुटीचा प्रयत्न फसला – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

सागर बडगुजर हा मुळचा धरणगांव येथील रहिवासी असून सौ. मंगलाबाई व श्री. प्रभाकर शिवदास बडगुजर यांचा मुलगा आहे. व गेल्या ८ वर्षांपासून तो महावीर पतसंस्था धरणगांव येथे शिपाई म्हणून कामाला आहे. व्यवस्थापक बद्रीनाथ भाटीया यांनी दुपारी पावणेचारच्या सुमारास त्याला बँकेत भरणा करुन येण्यास सांगितले.

महावीर अर्बन पतसंस्थेचा २ लाख ११ हजाराचा भरणा अर्बन बँकेत घेवून जाणाऱ्या सागर प्रभाकर बडगुजर (वय २२) याला धनगर गल्लीत मागून मोटारसायकवलर तोंड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अडवून त्यास मारहाण करत पैसे असलेली थैली हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र मार खाऊनही सागरने काही अंतरावर असलेल्या अर्बन बँकेकडे धाव घेतल्याने सदर आज्ञात लुटारुंनी मागच्या मागे पळ काढला. दिवसा- ढवळ्या घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

त्यावेळी तो धनगर गल्लीतून पायी जात असतांना समोरुन तोंड बांधून मोटारसायकलवर आलेल्यांनी त्याच्याजवळ गाडी थांबविली. या दोन अज्ञात युवकांनी उतरुन त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याला छातीत व काही तरी हत्याराने डोळ्याजवळ मारले व त्याची भरण्याची २ लाख ११ हजार रक्कम असलेली थैली हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पिवशिला हिसका देवून बँकेकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने संस्थेचे व्यवस्थापक बद्रीनाथ व चेअरमन डॉ. मिलिंद डहाळे यांनी धाव घेऊन सागर बडगुजरची भेट घेत त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेले. तसेच पोलीस स्टेशन जाऊन माहिती दिली. या प्रकरणी पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सागर बडगुजर ने प्रसंगावधाने बँकेकडे धाव घेऊन लुटीचा प्रयत्न फोल ठरविला. मार खाऊन ही हिम्मत दाखवून त्याने अतिशय प्रामाणिक पणे आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडली यामुळे त्याचे बँके तील कर्मचारी वर्ग, व्यवस्थापक आणि संचालकांनी कौतुक केले व तब्येत विषयी विचारपूसही केली. तसेच धरणगांव येथील बडगुजर समाज बांधवांनी सुध्दा त्याच्या शौर्याचे कौतुक केले. आपण जर अशा वेळी प्रसंगावधाने निर्णय घेतला तर मोठा अनर्थ टळू शकतो हे सागर ने दाखवून दिले.

सागर च्या या शौर्यास युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर. इन टिमचा सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

चि. सागर बडगुजर, धरणगांव

1 Comment

  1. चि. सागर, मोठ्या हिम्मतीने चोरांच्या तावडीतून निघून प्रसंगावधान साधत पैसे व आपण स्वतः बँकेत पोहोचलात. आपण खरंच बहादूर आहेत. एवढ्या कमी वयात केलेल्या ह्या कार्यासाठी आपले खुप खुप कौतुक करण्यासारखे आहे ! खुप खुप अभिनंदन ! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*