डॉ. अमोल चिंतामण बडगुजर यांना IIT Bomnayच्या वतीने ई-दीक्षांत समारंभात PHD पदवी प्रदान

जळगाव येथील डॉ. अमोल चिंतामण बडगुजर यांना आय.आय.टी बॉम्बेच्या वतीने आयोजित 58 व्या ई-दीक्षांत समारंभात काल दि. २३ ऑगस्ट रोजी पीएच.डी.पदवी प्रदान केली गेली.

डॉ. अमोल यांनी धातुशास्त्र अभियांत्रिकी व पदार्थ विज्ञान (Metallurgical Engineering and Materials Science) क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी नऊ आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित केले आहेत आणि त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे.

सदर दीक्षांत समारंभ सध्याच्या कोविड १९ व लोकडाऊन परिस्थितीमुळे IIT च्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.  ह्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवर करण्यात आले.

डॉ. अमोल चिंतामण बडगुजर

ते जळगाव येथील सौ. नलिनी व डॉ.चिंतामणराव दोधू बडगुजर, प्राध्यापक व वैज्ञानिक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पुणे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*