नाशिक येथील समाज बांधव श्री. महेश रामकृष्ण बडगुजर हे एक उमदा व्यक्तीमत्व आहेत. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर असतात. समाज कल्याण समिती आणि बडगुजर प्राऊड टिमचे ते समर्थक आहेत. आमच्या युवा टिम सोबत महेश दादांनी कार्य केले त्यांचा अनुभव आणि विचार शेअर करत त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवाचा सुयोग्य वापर करत ते नेहमीच युवा टिमचे समर्थन करतात. यापुढे आपले मार्गदर्शन आम्हाला लाभेल यात मुळीच शंका नाही. अतिशय प्रेमळ अशा आमच्या लाडक्या महेश दादांना सेवानिवृत्ती च्या बडगुजर प्राऊड ग्रुप व अ. भा. ब. स. युवक समिती कडून हार्दिक शुभेच्छा.
?? ..ऋणनिर्देश.. ??
सप्रेम नमस्कार, वि. वि…
बॉश परिवारातील मित्रांनो…
मी महेश रामकृष्ण बडगुजर, मायको मधील जॉइनिंग 29 मार्च 1991 डिपारमेंट W – 141, नंतर डिपार्टमेंट बदलले, W – 131, त्यानंतर 1 फेब्रुवारी 1997 परमनंट लेटर मिळाले, आणि डिपार्टमेंट W – 142 ला ट्रान्सफर केले. W – 142 ला काम कमी झाल्यामुळे साधारण 2000 मध्ये DSLA ला पाठवण्यात आले. DSLA पेक्षा CRI ला जास्त इन्सेंटिव्ह मिळणार अशी चर्चा होती, म्हणून रिटर्न आणि ओरल टेस्ट पास होऊन 6 नोव्हेंबर 2005 मध्ये CRI ARMATYRE हे डिपारमेंट मिळाले, असा हा 29 वर्षाचा प्रवास करीत आज दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी 29 वर्षांची बॉशची सेवा पुर्ण करुन स्वेच्छा सेवानिवृत्त होत आहे.
सर्वात प्रथम मी बॉश ग्रुपचा (नाशिक प्लांट) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. केवळ बॉश कंपनीमुळे माझे स्वतःचे आणि माझ्या कुटुंबियांचे आयुष्य अत्यंत सुखकर आणि आनंदमय झाले. माझे आणि माझ्या कुटुंबियांचे समाजातील स्थान, रहाणीमान आणि मान सन्मान केवळ बॉश कंपनीतील सेवे मुळेच उंचावले. याबद्दल मी बॉश ग्रुपचा आणि बॉश व्यवस्थापनाचा अत्यंत ऋणी आहे.

आज करोणा मुळे जागतिक लेव्हलला मार्केटची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे कंपनीला कंपनीच्या भल्यासाठी काही पाऊल उचलावे लागले, त्यात सर्वात महत्वाचं EVR स्कीम, कंपनी चांगल्या प्रॉफिट मध्ये चालावी, किंवा वेगवेगळे खूप काही कारणं असतील, म्हणून कंपनीने EVR स्कीम लावली. पण स्कीम लावताना बॉश मॅनेजमेंटने आमच्या कुटुंबियांचा फार विचार करून फारच चांगली रक्कम दिली. त्याबद्दल बॉश मॅनेजमेंटचे खूप खूप आभार, मी या घटनेकडे बोनस लाइफ म्हणून बघेन, आणि ह्या वेळेचा चांगला सदुपयोग करून घेईल… असो.
गेल्या 29 वर्षांत अनेक घडामोडी झाल्या. अनेक आनंदाच्या घटना घडल्या. काही दुःखद घटना घडल्या. काही जिवलग मित्र दुरावले. अनेक नविन सहकारी आणि मित्र आयुष्याशी जोडले गेले. परंतु प्रत्येक प्रसंगात आपण सर्वांनी मला मोलाची साथ आणि भक्कम मदतीचा हात दिलात. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे माझी 29 वर्षांची प्रदिर्घ सर्विस चांगली झाली, आणि आनंदात पार पडली. त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि मित्रपरिवाराचा अत्यंत ऋणी आहे.
कंपनीत काम करीत असताना कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाचे मन दुखावले गेले असेल त्यांनी मोठ्या मनाने मला माफ करावे. ही विनंती…
गेल्या 29 वर्षांत प्रत्येक आर्थिक अडचणीच्या प्रसंगी आर्थिक मदतीची मोलाची साथ दिली त्या बॉश (मायको) सोसायटीच्या विद्यमान संचालक मंडळाचे आणि सर्व माजी संचालकांचे देखील आभार. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे.
तसेच विद्यमान युनियन पदाधिकारी आणि सर्व माजी युनियन पदाधिकाऱ्यांचे देखील खूप खूप आभार.

यानंतर आपल्या भेटीगाठी कमी होतील. सहवास कमी होईल. परंतु आपली सर्वांची आठवण मात्र रोजंच येत राहिल. कारण गेल्या 29 वर्षांपासुनचे आपले घट्ट ऋणानुबंध लगेच एकदम तुटणे अशक्य आहे.
मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभार आणि मनःपुर्वक धन्यवाद.
आपलाच प्रेम, आनंद देणारा आणि घेणारा…
महेश रामकृष्ण बडगुजर, ( मुन्नाभाई )
सी आर आय, आर्मिचर…
??…धन्यवाद… ??


महेश जी, खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. आता पुढील काळात आपल्या हातून अजून जास्त समाजसेवा घडो ही सदिच्छा
माननीय श्री महेश रामकृष्ण बडगुजर साहेब नाशिक,
खुप चांगल्या कंपनीत आपण ज्ञानपुर्ण व उत्साहात मोठ्या प्रमाणात मित्र जोडून सेवा दिलीत.ही प्रचंड मिळकत सोबतीस घेऊन निव्रृत्ती घेतलीत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा सर!
नमस्कार!
श्री . महेश भाऊ , आपण उत्कृष्ट असे काम करून सेवानिवृत झालात , नोकरीत असतांनाही सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेतला ही आनंदाची गोष्ट आहे
आपले उर्वरीत आयुष्य सुखाचे , समृध्दीने , निरोगी जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना , सेवानिवृत्त जीवनाचा आनंद घ्या, भरपूर प्रवास करा