कर्तव्य दक्ष बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना वीरांचा सन्मान – बडगुजर समाजातील आरोग्य सेवक श्री. दिनेश बारकू बडगुजर यांचा ‘कोरोना वीर’ म्हणून नायब तहसीलदार यांच्या हस्ते सन्मान – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

श्री. दिनेश बारकू बडगुजर हे पारोळा येथील समाजबांधव श्री. बारकू सुकलाल बडगुजर व सौ. प्रमिला बारकू बडगुजर यांचे चिरंजीव आहे. श्री. बारकू बडगुजर हे कॉटेज हॉस्पिटल पारोळा येथील रिटायर्ड क्लर्क आहेत.

श्री. दिनेश भाऊ हे ग्रामीण रुग्णालय धरणगांव येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर सन २००८ पासून कार्यरत आहेत. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे प्रभागात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

मुळातच श्री दिनेश भाऊ यांना त्यांचे वडील आरोग्य विभागत सेवेला असल्यामुळे त्यांना आरोग्यसेवेचा व समाजसेवेचा वारसा आपल्या वडीलांपासुन लाभला आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी तत्पर सेवा देऊन. बऱ्याचशा रुग्णांना दिलासा देणे त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना मानसिक आधार देऊन त्यांची सेवा त्यांनी केली. तसेच या कोरोना महामारीच्या काळात स्वतः सुध्दा आजारी होते तरी न डगमगता आपले कर्तव्य चोखपणे बजावले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धरणगांव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना काळात असामान्य कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिकांचा ‘कोरोना वीर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये रूग्णालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यातच श्री. दिनेश भाऊ यांचा सुध्दा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, कर्तव्यचे अध्यक्ष सुनील चौधरी, मेजर डी. एस. पाटील, बी. आर. महाजन हे उपस्थित होते.

दिनेश भाऊ, हे अ. भा. ब. स. युवक समितीचे जळगांव जिल्हा अध्यक्ष आहेत. तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा चे अध्यक्ष व बडगुजर वेब पोर्टल टिमचे फाउंडर सदस्य पण आहेत. त्यांना मिळालेल्या गौरव व सन्मानाबद्दल युवक समिती, प्राऊड ग्रुप व सर्व वेब पोर्टल टिमकडून खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.

नायब तहसीलदार यांचे कडून सन्मानपत्र स्विकारतांना श्री. दिनेश बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*