त्वरा करा…त्वरा करा आणि खास मेजवानीचा आस्वाद घ्या – प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव

त्वरा करा …….. त्वरा करा…….आणि खास मेजवानीचा आस्वाद घ्या………..
बडगुजर समाजासाठी आजचा दिवस खास ठरणार आहे आज बडगुजर समाजातील माता-भगिनी आबालवृद्ध तसेच तरुणांसाठी मोठी मेजवानी मिळणार आहे.


यात आज दुपारी तीन वाजता शहादा येथील सौ रोहिणी ताई बडगुजर या ऑनलाइन घरी बसल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. पर्यावरणपूरक अशा पद्धतीने यंदा कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सवाला मर्यादा आलेल्या असल्या कारणामुळे यंदा बाप्पाचे आगमन हे प्रत्येकाच्या घरात होणार आहे. त्यासाठी पर्यावरण पूरक अशी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण समाजातील सर्वांना घेता येणार आहे यातून पर्यावरण वाचविण्याचा तसेच ऑनलाइन साधनांच्या माध्यमातून कोरोना पासून सुरक्षित घरीच राहून सण उत्सव कसे साजरे करावे याविषयी अधिक ची माहिती आपणा सर्वांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांनी संयुक्तरीत्या आयोजन केलेले आहे. मी वैयक्तिक तद्वतच आयोजकांच्या वतीने सर्वांना आग्रहाची विनंती करतो की आपण समाजाचे एक घटक म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण अनुभव मिळवण्याचा आनंद घ्यावा ही पुनश्च सर्वांना विनंती

प्रा.मिलिंद बडगुजर (जळगाव)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*