आकाशाचे रंग धरतीवर – World फोटोग्राफी डे निमित्त दै. दिव्यमराठी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत कु. समिक्षा मनोज कोतवाल हिने काढलेल्या फोटो ला प्रथम क्रमांक – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

वातावरणातले रंग आणि चेहऱ्यावरचे भाव टिपणारी हे छायाचित्र ठरले आहे. ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम
विजेते. आपण कसले छायाचित्र घेत आहोत याचे पूर्ण भान ठेवत, रंगसंगतीचा आणि चेहऱ्यावरील भावनांचा अचूक वेध घेणाऱ्या या छायाचित्रकारांच्या नजरेचे’ आणि समयसूचकतेचे मोल नक्कीच अनमोल आहे.

कु. समिक्षा मनोज कोतवाल ही कुर्हे पानाचे येथील सौ. संगिता व श्री. मनोज अशोक कोतवाल यांची सुकन्या आहे. ती नंदुरबार येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. अतिशय हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांनी आहे. तिला अभ्यासाव्यतिरिक्त फोटोग्राफी ची आवड आहे. ती निसर्गाचे विहंगम फोटो छंद म्हणून काढत असते. जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्त दैनिक दिव्य मराठी तर्फे स्पर्धेची माहिती वाचल्यानंतर तिने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी एक फोटो क्लिक केला. अतिशय सुंदर असा हा फोटो कु. समिक्षाने आपल्या घराच्या ओट्यावरून सायंकाळच्या जमिनीवर पडणाऱ्या सुर्यकिरणांच्या नैसर्गिक सौदार्यास आपल्या कमेऱ्यात क्लिक केले.

कु. समिक्षा ही बडगुजर प्राऊड ग्रुपचे लोकेश कोतवाल यांची चुलत बहीण आहे तसेच फागणे येथील श्री. श्यामकांत बडगुजर सर यांची भाची आहे. तिला मिळालेल्या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आजोबा, आजी, काका काकू आणि समस्त कोतवाल परिवार कुर्हे पानाचे तसेच अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

1 Comment

  1. सुकुमारी: समिक्षा मनोज कोतवाल-कुर्हे पानाचे
    दीदीचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
    मातापिता यांचे अभिनंदन!
    / डॉ दिलीप धोंडू बडगुजर-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published.


*