बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे
ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन
नंदुरबार-शहरातील समस्त बडगुजर समाज बांधवांना कळविण्यात येते की, सद्या जगासह आपल्या देशात कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, सोशल डिस्टन्स सारखे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम-कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. परंतु या लॉकडाऊन काळात शासनाचे नियम पाळून काही सामाजिक संघटना, संस्था ऑनलाईन सुविधेच्या माध्यमाने विविध उपक्रम राबवित आहे.
या कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आपल्या बडगुजर समाज उन्नती मंडळाचा यावर्षी होणारा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम होणार नाही, हे सर्वांना माहित आहे. परंतु आपल्या मंडळामार्फत समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच समाज बांधवांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरले आहे. या निबंध स्पर्धेसाठी लहान गट (इयत्ता ५ ते ८ वी), मोठा गट (इयत्ता ९ ते १२ वी) तसेच खुला गट (इयत्ता १२ वी पुढील सर्वांसाठी) असे तीन गट पाडण्यात आले आहेत. तरी सर्व स्पर्धकांनी आपापले निबंध सुवाच्च अक्षरात एका कागदावर लिहून त्याचा व्यवस्थित फोटो काढून दि.२५ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८८८८७८९६८६ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप करावेत. प्रत्येक गटातील विजेते तीन स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषीक (भेटवस्तू) देवून गौरविण्यात येईल.

लहान गट
इयत्ता ५ वी ते ८ वी
विषय : लॉकडॉऊनमधील सकारात्मक बदल
(शब्द मर्यादा किमान ३००)

मोठा गट
इयत्ता ९ वी ते १२ वी
विषय : कोरोना नियंत्रण आणि नागरीकांची भुमिका
(शब्द मर्यादा किमान ५००)

खुला गट
इयत्ता १२ वी पुढील सर्वांसाठी खुला
विषय : ऑनलाईन शिक्षण काळाची गरज?
(शब्द मर्यादा किमान ७००)

टिप : निबंध लिहिण्यासाठी सोबत दिलेल्या नमुनानुसार निबंध लिहून पाठवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*