???दुसरा स्मृतीदिन???
गोष्ट आमच्या राघोजी (बैल) ची…(आठवण बैल पोळा सणाची) – श्री संजय (नाना) सिताराम बडगुजर, धरणगांव.
मी लहान असताना सातवी इयत्ते मध्ये मराठी विषयातील “पाखऱ्या” हा पाठ शिकलो. आपल्या पैकी बरेच हा पाठ शिकले असाल त्या मधील पाखऱ्या व तात्या यांच्यातील प्रेम आपणास नक्की आठवत असेल तसेच प्रेम आमच्या सर्व परिवाराला ही राघो (बैल) बद्दल होते..
आज दि.१८/८/२०२० बैल पोळ्याचा सण. आजच आमच्या राघोला देवा जवळ जाऊन दोन वर्ष झालीत. आजचा सण हा खास त्याचाच आहे. वर्ष २०१८ रोजी पोळा सणाच्या दिवशी पुरण पोळीचा घास त्याला भरवायचा होतो पण त्याला तो नैवद्य म्हणुन मिळाला. ही गोष्ट आमच्या सर्व परिवाराच्या मनात खंत म्हणुन राहिली.

राघो आमच्या वाड्यात सन १९९६ रोजी त्याच्या आई (गाय) सोबत आला त्यावेळी तो फक्त एका महिन्याचा होतो. त्यावेळी आठरा वर्षातुन कोकीळेचे व्रत आले होते. त्या निमित्त आमच्या आईने त्या दोघ माय लेकाचे नामकरण केले राघो(बैल) व कोकीळा(गाय).
राघो सोबत खेळताना आम्हा तिन्ही भावंडांना खुप मजा यायची. राघव आमच्या सोबत पुर्ण घरभर फिरत असे. राघो व कोकीळा वाड्यात आल्यामुळे वाड्याचे पुर्वीचे समृध्दीचे दिवस आले असे आमचे वडिल (तात्या) मानायचे. रोघो व कोकीळेचा पायगुण म्हणुन आमच्या विहिरीला भरपुर पाणी लागले त्यामुळे उत्पन्न ही भरपुर येऊ लागले.
पुढे आमचा राघो मोठा होऊन आमच्या मळ्यात मशागतीची काम करू लागला त्याच्या सोबत ५ ते ६ बैल बदलली गेलीत. राघो सोबत काम करणारे कै.जानकीराम बाबा व कै.पुलचंद महाजन (काका) यांचे ही राघो वर फार प्रेम होते. तसेच आमचे वडिल (तात्या) सुध्दा राघोला चौथा मुलगा मानत. आम्हा तिघ भावंडांच्या लग्नाचे मांडव (आंब्याच्या डहाळ्या) राघोनेच बैलगाडीने आणले होते.
राघोने सन २००२ ते २०१६ पर्यंत शेतीची काम केलीत. या कालावधीत संपुर्ण वाड्याची रंचना झाली. मी व मोठे बंधु (दादा) नोकरी निमित्त बाहेर गावी होतो. राघोचा वयाचा विचार करून राघोची आरामाची सोय म्हणुन मुक्काम मळ्यातच ठेवला.
सन २०१८ रोजी पोळा होता म्हणुन आमचे मधले बंधु नाना यांनी राघोला मळ्यात पाण्याने अंघोळ घातली होती पण राघोला पुरण पोळीचा घास भरवण्या आगोदरच राघो आम्हा सर्वांना सोडून गेला होता व राघोला नैवद्य मरणानंतर मिळाला म्हणुन वाईट वाटले. आम्हा सर्वांच्या मनाला हुरहुर लावून गेला. दुसरे दिवशी राघोची पुजा करून कोरे कापड पांघरून जेसीबी च्या मदतीने खोल खड्डा खोदून राघोला भुमिगत (दफन) केले. आमचे आईवडिल व मधले बंधु नाना यांनी आश्रू नयनांनी राघोला श्रध्दांजली वाहिली होती.
राघोला भावपुर्ण श्रध्दांजली व पोळा सणा निमित्त विनंम्र अभिवादन..!??????
श्री. नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार, धरणगांव.


Leave a Reply