नमस्कार, नमस्कार माता व बघिणी (भगिनी) – मी श्री. धर्मेश बडगुजर युवा संघटन सुरत यांची संकल्पना मांडत आहे. माझ्या मनात बऱ्याच दिवसा पासुन एक विचार येत होता, की आपल्या बडगुजर समाजाचे सोशल ग्रुप व बडगुजर वेब पोर्टल (वेबसाईट) पण आहे. त्यांतुन समजा बद्दल, समाज विषयी व समजा बांधव यांची रोजची माहिती, गोष्टी ह्या ज्ञात होतात. पण आता पर्यत फक्त महिला भगिनी साठी त्यांचा स्वतः चा ग्रुप नव्हता विचारातून आम्ही महिला भगिनीचे संघटन करायचे ठरविले व माझी संकल्पना श्री. विनोद यांना सांगितली. अशातर्हेने “जय चांमुडा माता हिरकणी” या व्हाट्सअँप ची संकल्पना उदयास आली. हा ग्रुप हा अल्प दिवसात फुल झाला व त्यासाठी प्रोत्साहन पर महिला भगिनी व अनेक समाज बांधव यांनीही फोन करून चांगली संकल्पना आहे म्हणुन आभार व्यक्त केले.
महिला भगिनी साठी स्वतंत्र ग्रुप, संघटन, एकत्रीकरण केले….
आता पुढे काय? असा प्रश्न आपल्याला निर्माण झाला असेल, तर “जय चांमुडा माता हिरकणी” 1,2,3 ग्रुप हे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. तर आता महिला भगिनी यांनी पुढे येऊन आपल्या समाज कार्यास मदत करावी. ती मदत बऱ्याच तऱ्हेने करू शकतात. आपले विचार, संकल्पना व समाज हा कसा अग्रेसर ठेवता येईल यासाठी चर्चा करता येईल.
आपण ” एक दिशा, एक उद्देश, बडगुजर समाज” ठरविले तर अशक्य असे काही नाही. यासाठी फक्त महिला भगिनी ची मदत पाहिजे. # शिक्षक – आपल्या समाजात महिला भगिनी ह्या शिक्षका व शिक्षण श्रेत्रात उच्च पदावर आहेत त्यांनी पुढे येऊन आपल्या समाजातील मुला -मुलींसाठी अभ्यास विषयक माहिती देणे, सेमिनार आयोजीत करणे, स्पर्धा परीक्षा विषयी माहिती देणे, त्या कोणत्या प्रकारच्या आहे, त्याचा अभ्यास कश्या प्रकारे करावा, त्या कधी असतात, दररोज आपल्या ज्ञानाविषयी माहिती देऊ शकतात.
# उच्च शिक्षीत / उच्च पदावरील महिला भगिनी – हे आपल्या क्षेत्रातील ज्ञान देऊ शकतात व कोणाला कुठही अडचण असेल म्हणजे आपल्या क्षेत्रातील नोकरी साठी प्रयत्न करून देऊ शकतो किंवा नोकरी आहेत यांची माहिती देऊ शकतात.
# इतर क्षेत्रातील महिला भगिनी – ग्रामीण, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका, यांच्या अंतर्गत बऱ्याच योजना ह्या राबविल्या जातात त्यांनी याची माहिती द्यावी किंवा ह्या योजनेत आपण कसा सहभाग घेऊ शकतात, कला, विणकाम, जेवणाचे पदार्थ बनविणे, मार्केटिंग, जाहिरात साठी सोशल मीडियाचा वापर , सेमिनार, यासाठी लागणारी माहिती द्यावी. जेणे करून सर्वाना त्यांचा फायदा होईल व यासाठी बडगुजर वेब पोर्टल टिम ही मदत करेल, समाजातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंब व समाजासाठी होईल व समाज हा एक शिखरावर पोहचवणे अशक्य राहणार नाही. यात काही त्रुटी असतील म्हणजेच ज्या महिला भगिनी चे कार्य किंवा क्षेत्र राहिले असेल त्यांनी पुढे यावे व प्रबोधन करावे. तरी आपण सर्व फक्त आणि फक्त केवळ बडगुजर महिला भगिनी यांनी ग्रुप 2 व ग्रुप 3 ला जॉईन व्हावे…. खाली लिंक दिलेली आहे. हे करत असताना सगळ्याचे विचार व संकल्पना ह्या पुढे नेत असताना काही गोष्टी ह्या कोणाला आवडतील किंवा विचार पटणार नाही, तरी आपण असे न करता आपण समजुन, विचार विनिमय करून व कुठल्याही प्रकारे राग, द्वेष न करता आपले कार्य हे करावे.
“एक दिशा, एक उद्देश, बडगुजर समाज” समाज कार्य करावे ही विनंती ….
चांगला “स्वभाव” हा
गणितातल्या शुन्यासारखा
असतो ज्याच्या सोबत
असतो त्याची किंमत
नेहमीच जास्त असते.
सदर उपक्रमा विषयी बडगुजर वेब पोर्टल टिमशी संपर्क केला व वेब पोर्टल, युवक समिती व प्राऊड ग्रुप यांच्या सोबत मिळून उपक्रम राबविण्यास आम्हाला आनंदच होईल. आपण सोबत आहोत आणि एक संघपणे कार्य नियोजन करूया. सदर महिला व्यासपीठावरील महत्वाचे विषय आपण बडगुजर वेब पोर्टलवर महिला विशेष याविभागात टाकण्यात येईल जेणे करून जास्तीत जास्त महिला भगिनींना याविषयी माहिती मिळेल.
आपणास संकल्पना आवडली असल्यास खालील व्हाट्सअँप ग्रुपला आपण जॉईन होऊ शकता. (फक्त महिला)
https://chat.whatsapp.com/IwsdoOYpHgn81ZdtkrB1PM
https://chat.whatsapp.com/FVyiYC8IXHZ9w4LqMHzZtu
आपल्या सूचना खालील नंबर वर देऊ शकतात.
श्री. धर्मेश बडगुजर – 9558293080
श्री. विनोद मोहकर 7276981218

Leave a Reply