खेडी कढोली, जि. जळगाव येथील श्रीमती वैशाली प्रमोद बडगुजर यांचे सुपुत्र चि. शुभम प्रमोद बडगुजर, याने 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 97% गुण मिळवुन शाळेत प्रथम – श्री. दिनेश भगवान बडगुजर, ठाणे

|| आराधना ||
खेडी कढोली, जि. जळगाव येथील रहिवासी श्रीमती वैशाली प्रमोद बडगुजर यांचे सुपुत्र चि. शुभम प्रमोद बडगुजर, याने 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 97% गुण मिळवुन शाळेत प्रथम क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले. माऊली श्रीमती वैशाली यांच्या अफाट धैर्याला, त्यांच्या अखंड कष्टाला तसेच यशस्वी पालक म्हणून निभावीत असलेल्या जबाबदारी ला त्रिवार सलाम ! कढोली सारख्या अतिशय छोट्या खेड्यात राहून, कुठल्याही मार्गदर्शना शिवाय, कुठल्याही आधुनिक साधन-साहित्या शिवाय चि. शुभम ने मिळवलेले निर्भेळ यश विशेष उल्लेखनीय आहे.

भविष्यात चि. शुभम ला आय. आय. टी. इंजिनिअरिंग करायचे आहे. या वाटचालीत त्याला काहीही मार्गदर्शन व आर्थिक मदत लागली तर आपल्या समाजातील प्रतिष्ठित सेवाव्रत संघटना आणि मी सदैव तयार आहोत. श्रीमती वैशाली यांची आराधना आई चामुंडा मातेच्या आशीर्वादाने नक्की सफल होईल ही खात्री आहे.


चि. शुभम तसेच श्रीमती वैशाली यांचे खुप खुप अभिनंदन ?????? आणि पुढील यशस्वी वाटचाली साठी अनकोत्तम शुभेच्छा.
~ शुभेच्छूक, दिनेश भगवान बडगुजर ठाणे, समस्त बडगुजर प्राउड टीम आणि badgujar.in टीम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*