ऐरोली नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर (C. P. Badgujar Sir) – प्रसिद्ध गायक आता युट्युबवर – श्री. अविनाश बडगुजर, नवी मुंबई

बडगुजर उत्कर्ष मंडळाची सदस्य पाक्षिक बडगुजर दर्शन चे संस्थापक सदस्य श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर ऐरोली नवी मुंबई ( पिळोदा) ता. अमळनेर जि. जळगांव) हे सरस्वती विद्यालय ऐरोली येथे माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून शैक्षणीक क्षेत्राबरोबरच सामाजिक कला , क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध स्तरावर २८ वर्षांपासून कार्यरत आहे. गायन क्षेत्रातील मोठा व्यासंग आहे. भावगीते, भक्तिगीते, युगल गीते, देशभक्तीपर गीते सुरेल आवाजात सादर करतात. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध स्तरावर आयोजलेल्या गायन स्पर्धेत पारितोषक पदके प्रमाणपत्र यांनी गौरवलेली आहेत. स्वरांजली ग्रुप ऑफ ऑर्केस्ट्रा हा संगीत संच आहे. या मार्फत नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात. स्व मोहम्मद रफीसहेब यांची गाणी उत्स्फूर्त सादर करतात. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी गायलेल्या इशस्तवणाने होते. भविष्यात नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन समाजाचा विकास योजना तयार करण्याचा मानस असल्याचे मत आहे.

सरांचे Youtube Channel सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.youtube.com/channel/UC0DrahQf0BG-uNpEevw1uMg

  • श्री. चंद्रकांत पितांबर बडगुजर, ऐरोली.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*