Endurance Technologies Limited तर्फे श्री.नरेंद्र सिताराम बडगुजर यांना ‘सर्वोत्कृष्ट पोस्टर’ करीता पारितोषिक – श्री. अतुल प्रकाश बडगुजर, औरंगाबाद

दरवर्षा प्रमाणे यावर्षी ही जागतिक महिला दिवस (८ मार्च २०२०) निमित्त इंडुरन्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड तर्फे लिंग समानता (Gender Equality) विषयावर कविता, घोषवाक्य, व पोस्टर्स रंगवा या सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत नरेंद्र यांनी गेल्या वर्षी देखील पोस्टर्स रंगविले होते व प्लांट लेव्हलला सेलेक्शन झाले होते. या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत इंडुरन्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड, औरंगाबाद तर्फे श्री नरेंद्र बडगुजर यांना “सर्वोत्कृष्ठ पोस्टर” करीता पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या पुर्वी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त ही नरेंद्र यांनी पोस्टर्स रंगविले होते. यात २०१९-द्वितीय व २०१८-तृतिय क्रमांक मिळविला होता. श्री नरेंद्र हे नेहमीच आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर पोस्टर्स काढत असतात व त्यातून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात.

श्री. नरेंद्र बडगुजर हे औरंगाबाद विभागाचे एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा सामाजिक कार्यत नेहमी सहभाग असतो. यांचे युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..!

श्री. नरेंद्र बडगुजर, औरंगाबाद

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*