जळगाव:येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास बंडू बडगुजर,आदर्श नगर,जळगाव यांचे सुपुत्र व प्रा.संजय बडगुजर यांचे लहान बंधु आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलीत लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर नितीन रामदास बडगुजर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या वतीने केल्या जाणाऱ्या कोरोना महामारीच्या अडचणीत सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी आर्सेनिक अल्बम कीट तयार करण्याच्या कामी त्यांच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पंधरा विद्यार्थ्यांना घेऊन अर्सनिक अल्बम किट तयार करण्याचे काम करीत आहे. या कामात त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून २६ जून ते २ जूलै २०२० या कालावधीत जवळपास 50000 किट तयार करून प्रशासनाला सहकार्य केले आहे.

याकामी त्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय गोरक्ष गाडीलकर याशिवाय इंडियन रेकॉर्ड सोसायटीच्या डॉक्टर अपर्णा मकासरे यांनी अभिनंदन केले असून समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप मोठे सहकार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शासनातर्फे डॉक्टर नितीन रामदास बडगुजर यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात येणार आहे.
सरांच्या या कार्यास युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचा सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.


खूपच चांगलं काम करत आहेत …