औरंगाबाद येथील श्री. सुनिल रमेश बडगुजर यांच्या नावाची पोलीस मुख्यालयाच्या फलकात ऐतिहासिक नोंद – समाजासाठी अभिमानास्पद बाब – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

दिनांक- 1 मे 2019 रोजी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह औरंगाबाद येथील बडगुजर समाजाच्या सामाजिक कार्याचे खरे सारथी श्री. सुनिल रमेश बडगुजर यांना प्राप्त झाले होते. मा.पोलीस महासंचालक श्री.सुबोधकुमार जायस्वाल, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतून ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पदक व पोलीस पदक प्राप्त झाले. त्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नांव असलेला फलक (बोर्ड )जिल्हयाच्या पोलीस कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा असे निर्देश देण्यांत आले होते. फलक लावण्यामागे एवढाच उद्देश होता की इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांपासून प्रोत्साहन व चांगल्या कामाची प्रेरणा मिळेल.
मा.पोलीस महासंचालक साहेबांच्या आदेशानुसार दिनांक- 2/6/2020 रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आला. त्यात औरंगाबाद येथील सुपरिचित वाक्तिमत्व सुनिल रमेश बडगुजर यांचे नांव समाविष्ट आहे.

मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह स्विकारतांना श्री. सुनिल भाऊ बडगुजर

बडगुजर समाजासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. सुनिलभाऊ यांचे वडील कै.रमेश महारु बडगुजर हे औरंगाबाद येथेच पोलीस दलात नौकरीस होते. औरंगाबाद शहरातील पोलीस दलाच्या दर्शनी बोर्डवर *बडगुजर* नांव वाचुन सुनिल रमेश बडगुजर यांच्या सह कै.रमेश महारु बडगुजर व सर्व बडगुजर समाजाचे कौतुक होत आहे. मराठवाडा भागात बडगुजर समाज नसताना देखील सुनिल भाऊ यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून बडगुजर समाजाचे नांव मराठवाडा विभागाचे मुख्य ठिकाण असलेल्या औरंगाबाद शहरात यशोशिखरावर पोहोचवले आहे.याचा पूर्ण समाजास अभिमान आहे भावी आयुष्यात अनेक पदकांनी आपण सन्मानित होवो ह्याच युवक समिती व बडगुजर प्रॉउड ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा.

समाजरत्न श्री. सुनिल रमेश बडगुजर, औरंगाबाद

4 Comments

  1. Congratulations, Sh.Sunilbhau
    Badgujar samaj will be proud of you. And wishing you for prosperous future.
    C.G.Badgujar
    Doordarshan,
    Jalgaon.

  2. सर्व बडगुजर समाजा करीता गर्वाची गोष्ट आहे की आपल्या समाजात असले कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी व समाजसेवक समाजात आहेत…

    फार फार अभिनंदन सुनिलशेट..!

  3. खुप छान ? अभिमानास्पद कार्य ?
    श्री.सुनिलशेठ आपला समाजाला निच्चीतच गर्व आहे !
    खुप खुप अभिनंदन व अनंत शुभेच्छा ! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*