?आवंदा लगीन नको…. ?
नवरदेव पारवर जावाऊ नही
घोडा मोटार गाडी बसाले नही
बँड नही नी डिजे नही
नाचा कुदानी बंदी व माय
आवंदा लगीन नको व माय।।
रुसन नको नी फुगन नको
व्याहीन डोक धोन नको
मान नको नी पान नको
तोंड उघड ठेवानी बंदी व माय
आवंदा लगीन नको व माय।।
रुखवत नको नी आहेर नको
फ्रीज कुलर मुळीच नको
जावाईले अंगठी अन चैन नको
जास्त पाहुणासनी बंदी व माय
आवंदा लगीन नको व माय।।
मामा मावशी आत्या नको
कलोरा कलोरी मुळीच नको
हौस नको अन मौज नको
मोकळ फिरानी बंदी व माय
आवंदा लगीन नको व माय।।
मंडप नही नी स्टेज नही
फोटो कॅसेट मुळीच नही
वर वधुना तोंडले माक्स राही
तोंड बांधी फिरन पडी व माय
आवंदा लगीन नको व माय।।
- रचना –
- श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर बोराडी,
सेवानिवृत्त प्राथ. शिक्षिका,
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कृत,
कवयित्री व समाज हितचिंतक
??धन्यवाद ??

Leave a Reply