मुंबई येथील समाजबांधव श्री. प्रभाकर बाबुलाल बडगुजर हे श्री. अशोक बडगुजर (नासिक), श्री. भास्कर बडगुजर (जळगाव) , श्री. सुधाकर बडगुजर (जळगाव), श्री. सुनिल बडगुजर (मुंबई- समाजसेवक ) यांचे बंधू आहेत. श्री. प्रभाकर बडगुजर हे शासकीय सेवेत दि. २७/०१/१९८४ रोजी मदर डेअरी ,कुर्ला येथे रुजू झाले .
३१ मे २०२० पर्यंत बृहन मुंबई दूध योजनेच्या आरे, वरळी, कुर्ला येथे काम करून शासकीय सेवेतील आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला.
दिनांक ३१ मे आपल्या शासकीय सेवा काळातील शेवटचा दिवस होता. ह्या संपूर्ण सेवाकाळात कोणताही डाग आपल्या सेवेत लागू दिला नाही. ही फार आदर्शवादी गोष्ट आहे. या सा-या संपूर्ण सेवाकाळात आपल्याला पत्नी सौ. वैशाली बडगुजर ची महत्वाची साथ सदैव साथ लाभली व घरातील वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद ही लाभले. श्री. प्रभाकर बडगुजर ह्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबाला खूप छान सांभाळले. व आपल्या कुटुंबासोबत इतर खूप लोकांचे आयुष्य देखील घडवले. आज त्यांचा एक मुलगा इंजिनियर व एक मुलगी डॉक्टर आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. ते नेहमी सकारात्मक दृष्ट्या विचार करतात ही खूप जमेची बाजू आहे.
त्यांनी आपले आयुष्य केवळ त्यांच्या कामासाठीच नव्हे तर विकास आणि आजूबाजूच्या लोकांच्या मदतीसाठी सुद्धा समर्पित केले आहे
त्यांच्यातील चांगले गुण, साधेपणा आणि किमान गरजांचा समावेश असल्यामुळे त्यांना खूप कमी समस्यांचा सामना करावा लागला .
आता आपल्या आयुष्याच्या दुसर्या डावाची ही सुरुवात आहे तरी आपणास निवृत्तीनंतरचे आयुष्य दीर्घ व निरोगी लाभो व आपल्या परिवारास सुख, समाधान व शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप


सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभाकर सर! सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्य सुदृढ,सुखी व समृद्धी ने जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
?? !! सेवानिवृत्तीच्या खुप खुप शुभेच्छा !! ??
आपणास सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य दीर्घ व निरोगी लाभो व आपल्या परिवारास सुख समाधान व शांती लाभो हीच कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या चरणी प्रार्थना !