श्री. मुकुंदराव गोपाळराव बडगुजर हे धुळे हेड पोस्ट ऑफिसमधून 41 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

धुळे हेड पोस्ट ऑफिस येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री.मुकुंदराव गोपाल बडगुजर याची आज दि. 30 मे 2020 रोजी पोस्टातिल 41 वर्ष 3 महीने प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाली आहे.

स्वभावाने शांत असलेले श्री मुकुंदराव गोपाळराव बडगुजर यांनी आपली प्रदीर्घ अशी शासन सेवा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात हालअपेष्टाने दिवस काढत असताना सुद्धा त्यांनी कधीही प्रामाणिकपणाची साथ सोडली नाही.

माननीय श्री मुकुंदराव गोपाळराव बडगुजर यांना दोन मुली व एक मुलगा असून. मुला-मुलींमध्ये भेद न करता त्यांनी तिघांना उच्चशिक्षित केले जीवन जगण्यासाठी योग्य मार्ग आणि दृष्टीकोन दिला.

मोठी मुलगी सौ. सुप्रिया अभिजित पवार ही पी जी डी एम एल टी शिक्षण पूर्ण केले. लहान मुलगी सौ स्वाती प्रशांत बडगुजर ही नाशिक येथे प्राध्यापिका आहे. मुलगा श्री. महेंद्र मुकुंदराव बडगुजर, बी. ई. इन्स्ट्रुमेंटेशन शिक्षण पूर्ण करून जळगाव येथे मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ आहे. मुलांच्या यशाचे श्रेय हे संपूर्णपणे त्यांचे वडील म्हणजे माननीय श्री मुकुंदराव गोपाळराव बडगुजर आणि आई सौ. रत्नमाला मुकुंदराव बडगुजर यांना जाते.

आदर्श संसार करत असताना सौ. रत्नमाला मुकुंदराव बडगुजर यांनी सुद्धा त्यांना तितकीच मोलाची साथ देत आहेत.
संसाराचा गाडा चालताना नोकरी सोबत श्री मुकुंदराव यांनी मयूर न्यूज पेपर एजन्सी स्थापन करून वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय सुद्धा करत आहेत.

कर्तुत्वान माणसाच्या सेवा पुस्तिकेत निवृत्त हा शब्द कधीच येत नाही. सेवानिवृत्ती ही एका अर्थाने नवीन जीवनाची सुरुवात असते.

श्री मुकुंदराव गोपाळराव बडगुजर यांना निवृत्तीनंतरचे निरोगी व दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीस युवक समिती, बडगुजर प्राऊड व बडगुजर.इन वेबसाईट परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*