- श्री.जगदीश दिलीप पवार(ग्रामसेवक) अमळनेर
जळगाव येथील श्री. साहेबराव सदाशिव पवार आज आपल्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग-पाचोरा या पदावरून आज रविवार दिनांक ३१ मे २०२० रोजी निवृत्त होत आहेत.
कल्याण येथील समाजबांधव श्री. संतोष सदाशिव पवार, श्री. दिलीप पवार (म्हसावद), कै. गुलाब पवार (नाशिक), श्री. अरुण पवार (कल्याण) यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. कनिष्ठ अभियंता, सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चोपडा, जिल्हा परिषद-जळगाव ते उपविभागीय अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग-पाचोरा हा मैलाचा टप्प्या अतिशय यशस्वीरीत्या पार केला.

श्री साहेबराव – यांनी दिनांक – २४/०८/१९८२ पासून शासकीय सेवेस सुरुवात केली. त्यांचा पुढील कार्यप्रवास खालील प्रमाणे आहे:
- १९८२ -१९९९ – चोपडा येथे कनिष्ठ अभियंता ते शाखा अभियंता पदावर
- १९९९- २००८ – जळगाव येथे शाखा अभियंता या पदावर
- २००८ – २००९ – बीड येथे उप अभियंता पदावर
- २००९ – २०१४ मुक्ताईनगर तालुका येथे उप अभियंता या पदावर कार्य
- २०१४-२०२० पाचोरा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग येथून निवृत्त
आपल्या संपूर्ण ३८ वर्ष सेवा काळात कोणताही डाग आपल्या चारित्र्यावर व सेवेवर लागू दिला नाही ही फार आदर्शवादी गोष्ट आहे. या संपूर्ण सेवा काळात सौ.संगीता (माहेर शिरपूर) यांची अनमोल अशी साथ आपणास सदैव दिली.
त्यांच्या ३ कन्या ह्या उच्चशिक्षित व विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत – श्री भाग्यश्री शेखर पढ्यार (कल्याण ) ह्या कल्याण येथे साकेत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, सौ. वीणा अविनाश बडगुजर (नवी मुंबई) येथे प्राध्यापक तसेच सौ. वर्षा अनुप बडगुजर पुणे येथे कॅप जेमिनी या कंपनीमध्ये आयटी क्षेत्रात कार्यास आहेत.
त्यांचे चिरंजीव श्री. निलेश पवार हे वेब टेल इलेकट्रॉसॉफ्ट, मुंबई या कंपनी मध्ये मार्केटिंग मॅनेजर पदावर कार्य कारित आहेत तसेच सुनबाई सुजाता यासुद्धा इंजिनीअर आहेत.
नकारात्मक किंवा सकारात्मक कर्मरूपी चेंडू आपण ज्या गतीने सृष्टीरुपी भिंतीवर फेकतो त्याच गतीने तो चेंडू पुन्हा सुख व दुःखाची कर्मफळ घेऊन आपल्या जीवनात येतो. हाच कर्माचा व निसर्गाचा सिध्दांत आहे. ‘कर भला तो हो भला’या न्यायाने आपण अनेक गावांचा पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्या असतील व गोर गरीब ग्रामीण जनतेचे आशीर्वाद मिळवले असतील.
आपण सदैव नोकरी व परिवार यात समनव्यय साधून योग्य न्याय दिला. मितभाषी, एक वरिष्ठ श्रेणी अधिकारी असून देखील आपण कधीही मोठेपणा चा आव आणला नाही.
एका टप्प्यावर आपली बीड जिल्ह्यात बदली झाली. ती ही अशा वेळी जेव्हा जेष्ठ मुलीचे लग्न होते. त्यावेळी ही आपण डगमगले नाहीत – जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. सेवेच्या अगदी शेवटच्या सेवे काळात देखील कोविड-१९ सारख्या गंभीर महामारीत आपण सेवा बजावली ही अभिमानस्पद बाब आहे.
श्री साहेबराव यांना निवृत्ती नंतर चे निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो हीच शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीस अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्रॉउड ग्रुप तर्फे तसेच बडगुजर.इन वेबसाईट परिवारातर्फे शुभेच्छा.

Seva Nivrutichya Hardin shubechya shri Pawar sahab