सेवानिवृत्ती श्री. भगवान चांगदेव बडगुजर (गिरणार सर) – श्री. धर्मेंंद्र पोपटराव बडगुजर, शिरपूर

आज दिनांक 31 मे 2019 रोजी डॉक्टर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय करवंद शिरपूर तालुक्यातील माध्यमिक शिक्षक आमचे मित्र दादासाहेब श्री. भगवान चांगदेव बडगुजर सर आपल्या तीस वर्षांच्या सेवेनंतर शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

श्री. बी. सी. बडगुजर (गिरणार सर) यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर पितृवत प्रेम केले. हसत खेळत, बीजगणित, भूमिती शिकवण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांना फार आवडायची. ते फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळेच्या स्टॉफमध्ये तसेच गावांकऱ्यांमध्येही लोकप्रिय आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असोत त्या सरांनी गरजूंना आर्थिक मदत करून सोडवली, परीक्षा फी असो, वह्या पुस्तके असो, शालेय गणवेश असो – विद्यार्थ्यांना सर्वतोपरी शक्य ती मदत सरांनी केली.

सर, अत्यंत उत्साही, धडाडीचे शिक्षक, अत्यंत मितभाषी व नम्र स्वभावाचे आहेत. आपले शैक्षणिक काम त्यांनी अत्यंत प्रमाणिक पणे व मनलावून केले. तसेच विद्यार्थ्यी व गावकऱ्यांच्या नेहमी संपर्कात राहून प्रत्येकाच्या सुखदुःखात ते हिररीने भाग घ्यायचे. श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. यामुळेच ते सर्वांचे प्रिय होते. त्यांचे बरेचसे विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक व उद्योजक झाले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांची इतकी श्रध्दा आहे की त्यांच्या मुलांना सुध्दा सरांनी शिक्षण द्यावे म्हणून त्यांच्या कडे ते आपल्या मुलांना पाठवितात.

एकाच शाळेवर सतत 25 वर्षापेक्षा जास्त सेवा आणि आपल्या शिकवण्याच्या शैलीमुळे हे लोकप्रिय होते की गावकऱ्यांनी त्यांची बदल होऊ दिले नाही. एकदा तसा प्रसंग आला तर त्यांनी ती बदली रद्द करून आणली. गावकऱ्यांची मागणी किसान विद्याप्रसारक संस्थेला मान्य करावी लागली.

सामाजिक कार्यात ही सर नेहमीच आघाडीवर राहतात. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, समाज कल्याण समिती मार्फत मी आहेर देणार नाही आणि घेणारही नाही अशी शपथ २ वर्षांपूर्वी दिली होती. त्यांचे पालन सुध्दा आपल्या मुलाच्या लक्षात करून आहेर व रोख रक्कम स्विकारली नाही. व एक नविन आदर्श समाजात निर्माण केला.

श्री. भगवान चांगदेव बडगुजर यांनाही आपल्या मुलांना व मुलीस उच्च शिक्षित केले आहे तसेच सुनांना सुध्दा शिक्षणाचे महत्त्व समजून सांगत असतात. त्यांचा परिवार हा अत्यंत सुखी समाधानी असून तिनही मुलांचे लग्न झाले असून ते सर्व गुण्यागोविंदाने आपली संसारवेल बहारत आहेत. सरांची पारिवारिक माहिती :
सौ. सीमा भगवान बडगुजर, धर्मपत्नी आणि मुलगी – सौ. भाग्यश्री व श्री. नारायण अशोक बडगुजर (जावई), सुन व मुलगा
सौ. रुपाली व श्री. तुषार भगवान बडगुजर,
सौ. शिवानी व श्री. चेतन भगवान बडगुजर, असा सुखी परिवार आहे.

अशा ऋषीतुल्य सरांना त्यांच्या शैक्षणिक सेवानिवृत्ती दिनी हार्दिक शुभेच्छा. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे, समृद्धीचे भरभराटीचे जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

अध्यक्ष : श्री. मोहन हिरालाल बडगुजर, उपाध्यक्ष – श्री. धर्मेंंद्र पोपटराव बडगुजर, शिरपूर.
अ. भा. ब. समाज कल्याण समिती.

श्री. घनश्याम आलोणे, सचिव
श्री. ज्ञानेश्वर मोरडीया, सहाय्यक सचिव
श्री. महेश रामकृष्ण बडगुजर,
डॉ. अतुल बडगुजर,
श्री. लोकेश कोतवाल आणि सर्व समाजकल्याण समिती सदस्य.

तसेच अ. भा. ब. स. युवक समिती , प्राऊड ग्रुप , बडगुजर. इन टिम यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानचे जावो. धन्यवाद.

1 Comment

  1. आपण माझ्यासारखा एक सामान्य व्यक्तीला सर्वांनी मनपूर्वक सेवनिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या मी आपल्या सर्वांचे आभारी आहे,सर्व समाज बंधुबघीणींचे पुनःश्च आभार, धन्यवाद जय चामुंडा माता ,

Leave a Reply

Your email address will not be published.


*