पाचोरा येथील डॉ. जितेंद्र बडगुजर यांचे पाठ्यपुस्तक लिखाणात महत्वपूर्ण योगदान – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

पाचोरा येथील प्रा. डॉ. जितेंद्र प्रल्हाद बडगुजर(मुळ गाव लोहारी) हे गेल्या 24 वर्षा पासून एम.एम.कनिष्ठ महाविदयालयात पाचोरा येथे मानसशास्त्र विभागात विभाग प्रमुख कार्यरत आहेत. प्रा.डॉ. बडगुजर हे 2013 पासून अभ्यासक्रम पुनर्रचना व संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे(B.O.S) सदस्य आहेत. यासोबतच महाराष्ट्र राज्य सेकंडरी हार्ड सेकंडरी बोर्ड पुणे, यांनी सुरू केलेल्या राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे देखील सदस्य म्हणून काम करत आहे.डॉ. बडगुजर हे रेहाबिलिटेशन सायकॉलॉजी म्हणून देखील काम करत आहेत व स्वतःचे समुपदेशन केंद्र ते चालवतात. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम पुनर्रचना मंडळाचे सदस्य म्हणून काम करीत आहे. या संस्था राज्यभरात दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम पुनर्रचना करीत असतात. सन 2017 पासून महाराष्ट्रभरात अभ्यासक्रम पुनर्रचनेचे काम वेगात सुरू झाले. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता अकरावी वर्गाचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात बदलला व सन2020-21 मध्ये इयत्ता बारावीचा बदललेला अभ्यासक्रम या वर्षापासून लागू होणार आहे यासाठी मागच्या पूर्ण दोनवर्षा पासुन प्रत्येक विषयातील विषय तज्ञांच्या मिटिंग बालभारती पुणे येथे आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक विषयातील आधुनिक विचारप्रवाह, बदललेल्या संकल्पना व नावीन्याचा ध्यास लक्षात घेऊन मुलांना तो अभ्यासक्रम जास्तीत जास्त कसा उपयोगी पडेल असा विचार अभ्यासक्रम पुनर्रचना मंडळ करते. प्रा. डॉ.जे. पी. बडगुजर व अभ्यास मंडळातील इतर सदस्य यांनी तयार केलेले इ .12 मानसशास्त्र या वर्गासाठीचे पुस्तक बालभारती ने काल दिनांक 24/5/2020 रोजी प्रकाशीत केले.

रेहाबिलिटेशन सायकॉलॉजीस्ट म्हणून देखील काम करतात मतिमंद व अपंग क्षेत्रात रेहाबिलिटेशन सायकॉलॉजिस्ट यांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते दिल्ली येथील आर सी आय या संस्थेचे ते मान्यताप्राप्त कौन्सिलर आहेत. अपंग क्षेत्रात कोणालाही करिअर करायचे असेल. तसेच शैक्षणिक संदर्भात किंवा कौटुंबिक मानसशास्त्रीय कोणत्याही समस्या असतील तर डॉ. बडगुजर यांचे मार्गदर्शन समाजबांधव घेऊ शकतात.

          डॉ .बडगुजर मानसशास्त्र या विषयात अतिशय सखोल अभ्यासु असुन त्यांच्या ज्ञानाचा फायदा नक्की अभ्यास मंडळाला व भविष्यातील विध्यार्थीना  होईल यात तिळमात्र शंका नाही.

या अगोदर अशा प्रकारची उपलब्धी आमच्या कनिष्ठ महाविदयालयाला फार कमी प्रमाणात मिळालेली आहे. या अशा अभ्यासु शिक्षकांचे मनापासुन हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्रॉउड ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा!???????????????

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*