कु. क्रिष्णा बडगुजर ही जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलीत, डाॕ. सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक, २०२०च्या आयोजित परिक्षेत,चोपडा तालुक्यात प्रथम – श्री. काशीनाथ पुंजू बडगुजर सर,चोपडा

चोपडाः श्री.सुधीर(भटू) श्रीराम बडगुजर (करोडपती) यांची मुलगी कु,क्रिष्णा सुधीर बडगुजर,(विवेकानंद विद्यालय, चोपडा इ.९वीची विद्यार्थिनी.
“जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलित डाॕ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परिक्षा २०२० च्या परिक्षेत चोपडा तालुक्यात(९४/१५०)गुण संपादन करुन प्रथम क्रमांक पटकावला.सदर परिक्षेत जळगांव जिल्ह्यातून १६४ विद्यार्थी होते त्यापैकी २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेत(जिल्हा मेरीट मध्ये ४ तर तालुका मेरीटमध्ये २३) तसेंच अमळनेर तालुका १० + चोपडा तालुका १७ असे २७ विद्यार्थी मेरीटमध्ये चमकलेत.
कु.क्रिष्णा व मातापित्याचे सर्वत्र कौतुक होत असून नातेवाईक,आप्तेष्ठ तथा बडगुजर समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अखिल,भारतीय बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राउड गृप,वेब पोर्टल टीम,तथा चोपडा,पारोळा,अमळनेर,धुळे येथील बडगुजर समाज शैक्षणिक संस्थांतर्फे कु.क्रिष्णा व मातापिता आजीआजोबांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*