# जर्मनीत दरवळतोय मराठी सुगंध – सौ. वृषाली व श्री. गणेश रामसे हे बडगुजर दाम्पत्य जपतेय हिंन्दू संस्कृती – श्री. दिनेश भगवान बडगुजर, ठाणे

।। जर्मनीत दरवळतोय मराठी सुगंध ।।

बर्लिन, जर्मनी स्थित आमचे परम स्नेही, उच्च शिक्षित दाम्पत्य श्री. गणेश रामसे (बडगुजर) व सौ. वृषाली सांबारे रामसे, तेथील मातीत आपली मराठमोळी संस्कृती-सण जपत आहेत. त्यासाठी त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आपले मराठी मित्र मंडळ गेल्या 5 वर्षांपासून सक्रिय आहे. नुकताच त्यांनी महाराष्ट्र दिन ही ऑनलाइन साजरा केला. त्याची youtube link खाली दिली आहे.

श्री. गणेश रामसे हे नवी मुंबई स्थित आपल्या बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. अतुल रामसे यांचे बंधू आहेत.

आज दि. 16 मे रोजी सौ. वृषाली यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी आपल्या सर्व बडगुजर परिवारा तर्फे तसेच badgujar.in च्या सर्व टीम तर्फे त्यांना अनकोत्तम शुभेच्छा देतो व प्रार्थना करतो की चामुंडा माता त्यांना उदंड, यशस्वी व असेच आनंदी आयुष्य प्रदान करो. त्यांच्या जग भ्रमंतीस तसेच त्यांच्या Travel Blog ला प्रोत्साहन म्हणून मी आपल्या सर्व्यांतर्फे त्यांना जगप्रसिद्ध प्रवासवर्णन मराठी लेखिका व माझ्या सुपरिचित सौ. मीना प्रभू यांच्या पुस्तकांचा संच भेट म्हणून पाठवत आहे.

सौ. वृषाली ह्या फोटोग्राफी आणि पर्यटन प्रेमी असून त्यांनी एकट्या नी जगभ्रमण करीत असतात तसेच आपल्याला घरबसल्या त्याचा आनंद त्यांच्या youtube चॅनेल My Lens and the World Map ह्या Travel Blog मधुन देत असतात. त्याची लिंक खाली दिली आहे, कृपया त्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा हीच विनंती. धन्यवाद.

https://www.youtube.com/channel/UCJdnGfPvA1xZgnygDt9QsPg

आपला स्नेही, दिनेश भगवान बडगुजर, ठाणे.

सौ. वृषाली व श्री. गणेश रामसे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*