चोपडा येथील राजेश अरुण बडगुजर यांची कन्या ऋतुजा हीने लाँकडाउनच्या काळामध्ये तापी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून या स्पर्धेत विजयी होण्यासाठी तिला आपल्या सर्व समाज बांधवांची लाईक व कमेंट हवे आहेत.
ऋतुजा चे वडील श्नी. राजेश अरुण कोतवाल हे मुळगाव चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी असून ते चहार्डी तालुका चोपडा येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर आई सौ कल्पना राजेश बडगुजर या सुद्धा चुंचाळे तालुका चोपडा येथे जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. घरातील शैक्षणिक वातावरणातील उपलब्धतेचा पुरेपूर फायदा ऋतुजा ने आपल्यासाठी करून घेतलेला आहे . ऋतुजा ही पंकज माध्यमिक विद्यालय चोपडा येथे इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असून तिला वक्तृत्वाची लहानपणापासूनच आवड आहे ऋतुजा नेहमी चोपडा तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या वकृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होत असते. शालेय वकृत्व स्पर्धे पासून सुरू झालेला हा तिचा प्रवास नक्कीच वाढत्या आलेखाचा आहे. तिने आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त आयोजित सावतामाळी युवक संघ तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये चोपडा तालुक्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित वकृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा तिने सहभाग नोंदविला आहे.

सध्या covid-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरू असून या काळात अनेक सेवाभावी संस्था विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करीत असतात .अशाच रीतीने तापी फाउंडेशनने खानदेश स्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धेत ऋतुजा हिने सहभाग घेतला असून या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तिने ऑनलाइन आपल्या वकृत्व स्पर्धेचे व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केलेला आहे सदर व्हिडिओज आपण बघून तिच्या वकृत्व शैलीचा आस्वाद घ्यावाच.तसेच लाईक व कमेंट करायला विसरू नये. कारण सदर स्पर्धेचा निकाल हा त्या व्हिडिओला प्राप्त होणाऱ्या लाईक कमेंट आणि शेअर यावर आधारित असल्याकारणाने आपल्या बडगुजर समाज च्या वतीने तिला अधिकाधिक लाईक कॉमेंट्स मिळाव्या यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती तसेच बडगुजर प्राऊड ग्रुपच्या वतीने आम्हीआवाहन करतो व सदर व्हिडिओ बघून अधिकाअधिक लाईक करावे ही आग्रहाची विनंती .
शब्दांकन प्रा.मिलिंद बडगुजर जळगाव

Leave a Reply